Hingoli Loksabha Result sakal
मराठवाडा

Hingoli Loksabha Result : आघाडीने राखला हिंगोलीचा गड;नागेश पाटील आष्टीकर विजयी, कोहळीकरांवर मात

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांनी हिंगोलीचा गड राखला. त्यांना एक लाख ८ हजार ६०३ इतके मताधिक्य मिळाले. त्यांनी महायुतीचे (शिवसेना शिंदे गट) बाबूराव कदम कोहळीकर यांचा पराभव केला. विजयी उमेदवार आष्टीकर यांना २६ व्या फेरीअखेर टपाली मतदानासह ४ लाख ९२ हजार ५३५ मते मिळाली. प्रतिस्पर्धी उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांना ३ लाख ८३ हजार ९३३ मते मिळाली. तर, तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. बी.डी. चव्हाण यांना एक लाख ६२ हजार ८१४ मते मिळाली.

यंदा ३३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. खरी लढत नागेश पाटील आष्टीकर व बाबूराव कदम कोहळीकर यांच्यात झाली. पहिल्या फेरीत पोस्टल मतांची मोजणी झाली. यात नागेश पाटील यांना १६ हजार २१२ मते मिळाली, बाबूराव कदम कोहळीकर यांना १७ हजार १४५ मते, तर वंचितचे डॉ. बी.डी. चव्हाण यांना ८०७५ मते मिळाली. दुसऱ्या फेरीत आष्टीकर यांना ३५ हजार ३९१, कोहळीकर यांना ३४ हजार ४८२, तर डॉ. बी.डी. चव्हाण यांना १४ हजार ८०४ मते मिळाली. यात आष्टीकरांनी ९०९ मतांची आघाडी घेतली. तिसऱ्या फेरीत आष्टीकर ५३ हजार ५२९, कोहळीकर ५१, तर डॉ. चव्हाण यांना २२ हजार ८८५ मते मिळाली. आष्टीकरांना २,५२३ मतांची आघाडी मिळाली.

चौथ्या फेरीत ६,४१० पाचवी फेरी ९,४७३, सहावी १६ हजार ७९०, सातवी फेरी १९,४११, आठवीत २२ हजार ७४२, नववीत २७ हजार ९६५, दहावीत ३५ हजार ३९०, अकरावीत ४१ हजार ६३६, बारावीत ५० हजार ५२, तेरावीत ५५ हजार २१८, चौदावीत ६१ हजार ७९१, तर पंधराव्या फेरीत आष्टीकरांना ३, ४८,०९९ मते मिळाली.

कोहळीकर यांना २,२३,८३६ मते मिळाली. सोळाव्या फेरीअखेर ८१ हजार ६३ मते. सतराव्यात ७९ हजार ७०४, अठराव्यात ८३ हजार ७५८, एकोणावीसमध्ये ८५ हजार ४६४, विसावीत ८९ हजार ६३२, २१ व्या फेरीअखेर ९१ हजार २४७, बावीसाव्या फेरीअखेर ९४ हजार ७५७, तेवीसावीत एक लाख ५४ हजार ४०, चोवीसावीत एक लाख ६१ हजार ६६, पंचवीसावीत एक लाख ७६ हजार ६६७, तर २६ व्या फेरीअखेर एक लाख सात हजार ८३३ मतांची आघाडी आष्टीकरांनी घेतली.

आमचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून मतदारांनी कौल दिला आहे. आता मतदारांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे. निवडणूक काळात विरोधकांनी माझ्यावर अनेक खोटे आरोप केले. माझी तिसरी पिढी राजकारणात आहे. यामुळे खरे काय खोटे काय याची मतदारांना माहिती आहे. त्यामुळेच भरभरून मतदान झाले. हा विजय जनतेचा आहे

- नागेश पाटील आष्टीकर, विजयी उमेदवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT