अशोक चव्हाण व डॉ. विपीन 
मराठवाडा

नांदेडला पालकमंत्र्यांसह प्रशासन कामात व्यस्त...

अभय कुळकजाईकर

नांदेड - कोरोनाला रोखण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी १५ दिवसापासून नांदेडला ठाण मांडले आहे तर दुसरीकडे जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी देखील रात्रंदिवस कामात व्यस्त आहेत. सुदैवाने जिल्ह्यात आजवर एकही रूग्ण सापडलेला नसून, कोरोनाला हरविण्यासाठी आता नागरिकांकडूनही शासनाच्या निर्देशांचे काटेकोर पालन होण्याची नितांत आवश्यकता आहे. नागरिकांनी घरातच बसून रहावे, एवढीच विनंती सर्वजण करत आहेत. 

कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत चालली असून नांदेडसारखे काही मोजके जिल्हे वगळता राज्यातील इतर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झालेले रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील परिस्थिती अशीच नियंत्रणात रहावी, यासाठी पालकमंत्री चव्हाण दररोज जिल्हाधिकारी डॉ. विपीन, पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर व इतर प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठकी घेत आहेत. तसेच मुख्यमंत्री व इतर प्रमुख मंत्र्यांच्या नियमित संपर्कात आहेत.

प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलात
नांदेड जिल्ह्यात ता. १५ मार्चपासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलात आणायला सुरूवात झाली होती. सार्वजनिक कार्यक्रम, शैक्षणिक संस्था, चित्रपटगृहे, मॉल, आठवडी बाजार बंद करण्याचा राज्य शासनाचा निर्णय येताच त्यावर तातडीने अंमलबजावणी झाली. बॅंक, एटीएम आणि विविध शासकीय कार्यालयांमधील गर्दी नियंत्रणात आणली गेली. कोरोनामुळे संपूर्ण देशभर मोठे स्थलांतर होऊन बाहेगावाहून सुमारे ४८ हजार नागरिक नांदेड जिल्ह्यात आले. त्यांची माहिती संकलित करण्यात आली असून, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना घरातच थांबण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरु
महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सोडून इतर सर्व आस्थापना बंद करण्यात आल्या. सर्व प्रकारच्या अनावश्यक वाहतुकीवर बंदी घातली गेली. अत्यावश्यक वस्तुंच्या वाहतुकीसाठी पासेस देण्याची व्यवस्था करण्यात आली. राज्याची व जिल्ह्याची सीमा बंद झाली. किराणा, दूध, भाजीपाला, औषधी आदींचा पुरवठा सुरळीत ठेवण्यात आला. नांदेड शहराच्या हद्दीत घऱपोच किराणाची सुविधा देण्यात आली. बाहेरगावांहून औषध मागविणाऱ्या रूग्णांच्या सोयीसाठी औषधांचे पार्सल, कुरियर न रोखण्याचे निर्देश देण्यात आले.

कामगार, कष्टकऱ्यांसाठी भोजनाची सोय
जिल्ह्यात जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले. प्रशासनाच्या मदतीसाठी ३०० होमगार्ड उपलब्ध करून देण्यात आले. नागरिकांची अडचण होऊ नये म्हणून विविध मदतकार्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले. २४ तास कार्यरत असणारा नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला. तहसील स्तरावरील अधिकाऱ्यांशी योग्यप्रकारे समन्वय रहावा, यासाठी यंत्रणा उभारली गेली. देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर बेघर, विस्थापित कामगार, परराज्यातील अडकलेले कामगार, तळहातावर पोट असलेले कष्टकरी आदींच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न समोर आला आहे. त्यांच्यासाठी अन्नधान्य व भोजनाची सोय स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. 

खबरदारीचा उपाय म्हणून...
जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून काही धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. मास्क, हातमोजे, पायमोजे अशी सुरक्षेची साधने स्थानिक पातळीवरच तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठातील सर्व उपकरणांनी सुसज्ज प्रयोगशाळेत कोरोनाची चाचणी करण्यासाठी ‘आयसीएमआर’कडे मान्यतेची मागणी करण्यात आली असून त्यानंतर नांदेड जिल्ह्यातच कोरोनाची चाचणी करणे शक्य होऊ शकेल.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jefferies Stocks: शेअर बाजार कोसळतोय; गुंतवणूक कुठे करावी? जेफरीजने सांगितले हे 14 स्टॉक खरेदी करा, होताल मालामाल

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मतदान केंद्रावरील भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

Assembly Election 2024: बीडच्या पोलिसाचा मुंबईत कारनामा! टपाली मतदानाचे फोटो गावाकडे पाठवले, गुन्हा दाखल

'मुश्रीफ ED ला घाबरून भाजपच्या पंक्तीत बसले, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, निवडणुकीत त्यांना पाडा'; शरद पवारांचा हल्ला

IPL Mega Auction 2025: सातवीत शिकणाऱ्या Vaibhav Suryavanshiला डिमांड; जाणून घ्या १३ वर्षीय पोराची कमाल...

SCROLL FOR NEXT