file photo 
मराठवाडा

नांदेडला पाणीपट्टीकराचा गोंधळ सुरूच

अभय कुळकजाईकर

नांदेड - महापालिकेतील पाणीपट्टी करासंदर्भात अजूनही गोंधळ सुरूच असून नागरिकांच्या याबाबत तक्रारी येत आहेत. यासाठी वापरण्यात आलेल्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड येत असल्यामुळे अडचण वाढली असल्याचे सांगण्यात आले असून महापालिका प्रशासनही हतबल झाले आहे.

ता. ३१ मार्च अखेरपर्यंत महापालिकेच्या वतीने मालमत्ता कर आणि पाणीपट्टी करासह इतर करांची वसुली करण्यात येत आहे. मालमत्ता कराची ता. ३१ डिसेंबरपर्यंत जवळपास ३३ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. त्याचबरोबर पाणीपट्टी कराचीही आतापर्यंत चार कोटी ३१ लाख ८३ हजार रुपयांची वसुली झाली आहे. मात्र, वसुली करताना किंवा पाणीपट्टी कर भरताना देण्यात आलेल्या मागणी बिलाच्या वेळी अडचणी येत आहेत. मागील कर भरलेला असतानाही काही जणांना मागील थकबाकीचाही उल्लेख येत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

५९ हजार नळजोडण्या
महापालिका हद्दीत पाणीपुरवठा विभागातर्फे ५८ हजार ८८२ नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. चालू वर्षाची २०१९-२० मधील पाणीपट्टी कराची मागणी १७ कोटी ५२ लाख रुपये आहे. मागील थकबाकी ४३ कोटी ४९ लाख रुपये आहे, तर शास्ती ३२ कोटी ९८ लाख रुपये आहे. अशी एकूण मागणी ९४ कोटी ५१ हजार रुपये असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली.

वसुलीवर होतोय परिणाम
सध्या पाणीपट्टी कर वसुलीसाठी ३५ वसुली कर्मचारी व सहा पर्यवेक्षक आहेत. मात्र, ही संख्या अपुरी असल्याचे तसेच त्यापैकी १६ जणांना यासोबत ‘बीएलओ’ चे काम देण्यात आले असल्याने त्याचा परिणाम वसुलीवर होत असल्याचे पाणीपुरवठा विभागातून सांगण्यात आले. तसेच या बाबत विचारणा केली असता पाणीपुरवठा विभागातील अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.

आता जबाबदारी कोणाची?
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आतापर्यंत चार कोटी ३१ लाख रुपयांची पाणीपट्टी कराची वसुली केली आहे. गेल्या वर्षी २०१८ - १९ मध्ये १४ कोटी ७९ लाख रुपयांची वसुली करण्यात आली होती. २०१२ पासून बसविण्यात आलेले सॉफ्टवेअर २०१५ पर्यंत सुरळीत होते. मात्र, त्यानंतर मागणी बिलामध्ये अडचणी येत असून त्याचा परिणाम वसुलीवर होत आहे. मागणी बिलावर थकबाकी दाखवत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढल्यामुळे आता जबाबदारी कोणाची? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: सोनं झालं 5,000 रुपयांनी स्वस्त; अवघ्या 15 दिवसांत सोन्याच्या भावात मोठी घसरण, आज काय आहे भाव?

Dehradun Accident: देहराडूनमध्ये भीषण अपघात, सहा तरुणांचा मृत्यू; काय आहे इनसाईड स्टोरी? पोलिसांकडे अद्याप तक्रार नाही

IND vs AUS: विराट कोहली जखमी? काल अचानक स्टार फलंदाज ऑस्ट्रेलियातील हॉस्पिटलमध्ये गेला अन्...

Latest Maharashtra News Updates : 'कटेंगे तो बटेंगे' हा देशाचा इतिहास- देवेंद्र फडणवीस

Sanjay Raut : भाजप एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीच काय विरोधी पक्ष नेता पण करणार नाही , संजय राऊत यांचा खोचक टोला

SCROLL FOR NEXT