नांदेड : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवित आहे. यांना हातभार लावण्यासाठी समाजातील दानशुर व्यक्ती पुढे येवून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पूढे येत आहेत. यात सामाजीक संघटना, स्वंयसेवी संस्थांचा समावेश आहे. नांदेडच्या तरुणांनीही कोरोना विरुध्द लढ्यासाठी शासनाला साथ देण्याचे ठरवत आनंदी मित्र परिवार सदस्य गट आणि सुखी सदस्यीय निधी गटातील तरुणांनी प्रत्येकी एक लाखाप्रमाणे दोन लाखाचा निधी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षासाठी दिला आहे. त्यांच्या या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पाच वर्षापूर्वी झाली गटाची स्थापना
नांदेडमध्ये विविध व्यवसाय व उपजिवीकेसाठी नोकरी करणाऱ्या ३८ मित्रमंडळीनी मिळून पाच वर्षापूर्वी आनंदी मित्र परिवार सदस्य गट आणि सुखी सदस्यीय निधी गट स्थापना केली. गट स्थापन करते वेळेस आम्ही समाजाचे आपल्यावर ऋण असतात. हे ध्यानात ठेवून सामाजिक सहायता हा पण एक उद्देश ठेवला होता. देशाच्या व महाराष्ट्र राज्याच्या संकटाच्या घडीला आमच्या बचत गटातर्फे सोमवारी (ता. ३०) जिल्हाधिकारी डॉ. विपीन , यांच्याकडे दोन लाखाचा धनादेश CHIEF MINISTER RELIEF FUND COVID 19 यांच्यासाठी सुपुर्द केला.
हेही वाचा.....लाॅकडाऊन मध्ये शिवभोजन थाळीचा आधार
शहीद जवानाच्या मुलीला केली मदत
आनंदी मित्र परिवार सदस्य गट आणि सुखी सदस्यीय निधी गटाने यापूर्वी आपले सामाजीक दायीत्व निभावले आहे. जम्मु काश्मीरमध्ये नागरोटा मुख्यायलावर आतंकवादी हल्ल्याच्या नंतर देशाच्या संरक्षणार्थ लढताना जानापुरी (ता. लोहा) येथील वीर जवान संभाजी कदम यांनी आपले सर्वोच्च बलिदान दिले. परंतु त्यांच्या पश्चात त्यांचा परिवार उघड्यावर पडला होता. त्यांना काहीतर आर्थिक मदत दिली पाहिजे म्हणून शहीद संभाजी जाधव यांच्या परिवाराला ३१ सदस्यांचा आनंदी मित्र परिवार गटातील सदस्यांनी चिमुकली मुलगी कु. तेजस्विनी संभाजी कदम हिच्या नावे तिच्या पन्नास हजाराचा एकरकमी जीवन विमा काढला. हा विमा आंनदी परिवाराच्या सदस्यांनी तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. स्वप्निल आढाव यांच्या हस्ते शहीद संभाजी कदम यांच्या परिवाराकडे सुपूर्द केला. या सोबतच सततच्या दुष्काळामुळे मराठवाड्यातील शेतकरी अडचणीत आले असता जलसंधारणाच्या कामासाठी नाना पाटेकर व मकरंद आनासपूरे यांच्या नाम फाऊंडेशनला ६२ हजार २४० रुपयांची मदत केली आहे.
हेही वाचलेच पाहिजे....डॉक्टर असलेले आरडीसी म्हणतात...खरी देशभक्ती दाखविण्याची हीच वेळ
मित्रमंडळातील सदस्य
विक्की बंग, राहूल बंग, दिलीप मस्के, गोपीनाथ हूस्सेकर, गंगाधर गौंड, सुनील वाघमारे, अजय मरकुंदे, नारायण जोशी, दिगंबर सरसे, गजानन येरावार, श्रीकांत उमरेकर, नरेश केशटवार, प्रदीप चिखलीकर, विजय जाधव, भुजंग भोसले, भास्कर अत्रे, सौ. बटाळकर, अण्णासाहेब पवार, विजय परगेवार, केशवराव कदम, शेखर लोखंडे, गंगाधर शिंदे, लक्ष्मण जाधव, डॉ. कौठाळकर, किशोर पाटील लगळूदकर, संजय जाधव, व्यंकटेश पेसनवार, दत्तराम मुंगल, संजय कोल्हे, वामन देशमुख, विकास लव्हेकर, के. एल. जाधव, शितल मुंडे, आकाश भुरे, संगीता किन्हाळकर, डॉ. अभिजीत ताटे, माधूरी जाधव आदींचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.