File Photo 
मराठवाडा

नांदेडला ‘कोरोना’चा तिसरा संशयीत

शिवचरण वावळे

नांदेड : दुबईहून चौदा दिवसापूर्वी नांदेड शहरात दाखल झालेल्या एका व्यक्तीस ‘कोरोना’ संशयीत म्हणून श्री गुरू गोविंदसिंघ मेमोरिअयल शासकीय रुग्णालयात स्थापन करण्यात आलेल्या ‘कोरोना’ विशेष वार्डात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलेल्या या व्यक्तीचे आवश्यक ते रक्त नमुने घेऊन ते पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.

रुग्णालयामध्ये तिसरा संशयीत
यापूर्वी नांदेड शहरात चीन आणि बहरीन येथून आलेल्या त्या दोन व्यक्तीस सर्दी आणि घशात खवखव होत असल्याने त्यांना विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आले होते. त्यानंतर नांदेड शहरातीलच एका व्यक्ती चौदा दिवसापूर्वी दुबईहून नांदेड शहरात आल्याची माहिती मिळाल्याने त्या व्यक्तीस बुधवारी (ता.११) श्री गुरू गोविंदसिंघजी स्मारक शासकीय रुग्णालयात विशेष वार्डात दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा- 30 तासानंतरही नदीपात्रातील युवक सापडेना

कोरोनासाठी विशेष कक्षाची व्यवस्था
दिवसागणिक ‘कोरोना’ व्हायरसच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून शहरातील शासकीय रुग्णालयात विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या शिवाय अचानक परिस्थिती उद्‍भवू नये म्हणून जिल्हाधिकारी यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) संघटनेचे पदाधिकारी व डॉक्टरांची बैठक घेऊन ‘कोरोना’ संदर्भात हलगर्जी करु नका, अशा सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयासोबत आता शहरातील मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटलमध्ये ‘कोरोना’च्या रुग्णांसाठी विशेष बेड राखीव ठेवण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.

हे ही वाचलेच पाहिजे- तुम्ही वाचाच : कशा रुंदावतात अनुभवाच्या कक्षा

आरोग्य यंत्रणा सतर्क
गुरुगोविंदसिंघ स्मारक शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या त्या संशयीत व्यक्तीच्या सर्व प्रकारच्या रक्त नमुने घेऊन ते पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर त्या संशयीत व्यक्तीस रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. शहरातील तिसरा रुग्ण दाखल झाल्याने शासकीय यंत्रणेची चांगलीच धांदल उडाली असून, आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

जिल्ह्यातील रुग्णालयात विशेष कक्ष स्थापन
शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयात मिळून ३४ बेड राखीव ठेवण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. १४ दिवसापूर्वी एक व्यक्ती दुबईहून शहरात आली होती. त्या व्यक्तीस संशयीत म्हणून रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. परंतु त्यास १४ दिवस झाल्याने घाबरण्यासारखे काही नाही. लवकरच जिल्ह्यातील तालुका पातळीवर आरोग्य अधिकारी यांना सुचना करुन त्या रुग्णालयात विशेष कक्ष स्थापन करण्याच्या सुचना देण्यात येणार आहेत.
- डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा शल्यचिकित्सक, नांदेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या ८७२ कर्मचाऱ्यांना नोटिसा! प्रशिक्षणालाही दांडी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढली यादी; आता दाखल होणार गुन्हे अन्‌ शिस्तभंगाची कारवाई

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Mumbai School : मुंबईत शाळा-महाविद्यालयांना तीन दिवस सुट्टी, काय आहे कारण? घ्या जाणून!

Sakal Podcast: जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यान १२ तासांचा ब्लॉक ते विम्याचे पैसे लाटण्यासाठी युवक बनले अस्वल

SCROLL FOR NEXT