फोटो 
मराठवाडा

खडतर दुर्ग घाटाला नांदेडकरांची गवसणी

कृष्णा जोमेगावकर

नांदेड ः पुण्याजवळील वेस्टर्न घाट रनर्स आयोजित ५३ किलोमीटरच्या खडतर सिंहगड, राजगड, तोरणागड या दुर्गमार्गे धावण्याच्या स्पर्धेत नांदेडमधील विवेक ताटे आणि प्रवीण राऊत यांनी भाग घेत यशाला गवसणी घातली आहे.

एसआरटी अल्ट्रा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कॅनडा, फ्रान्स, बांग्लादेश या देशातून स्पर्धकांनीही भाग घेतला होता.
ता. आठ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता स्पर्धेची सुरवात झाली. यात देशातील विविध भागांसह बाहेर देशातील तरुणांनी भाग घेतला. यात मराठवाड्यातून केवळ नांदेड जिल्ह्यातील विवेक ताटे आणि प्रवीण राऊत यांनी भाग घेतला. ते सव्वासात वाजेपर्यंत सिंहगड टॉप मार्गे कल्याण दरवाजा, विंझरगाव मार्गे गुंजवणे येथे २५ किलोमीटरजवळ साडेदहाच्या दरम्यान ते पोचून तेथून राजगड पार करत कटऑफ ३४ किलोमीटरजवळ दुपारी सव्वा वाजता पोचले. एक टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर त्यांनी दीडच्या सुमारास तोरणागडाची चढाई चालू केली. सव्वाचारच्या दरम्यान ४४ किलोमीटरजवळ पाचव्या एंड स्टेशनला पोचले. साडेपाच वाजता फिनिश लाईन गाठून एसआरटी ‘अल्ट्रामेन’ होण्याचे पाहिलेले स्वप्न पूर्ण झाल्याचे ते अभिमानाने सांगतात.

हेही वाचा ---...या रानभाज्या नामशेष होण्याच्या मार्गावर

५३ किलोमीटर स्पर्धेत देश - विदेशातील १५९ तरुण - तरुणांनी भाग घेतला होता. यातील ७० स्पर्धक बारा तासांच्या आत निर्धारित ठिकाणी पोचण्यात यशस्वी झाले. यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प तसेच पदक देऊन गौरविण्यात आले. मराठवाड्यातून दोघांनी भाग घेऊन स्पर्धेत यशस्वी होण्याचा मान विवेक ताटे आणि प्रवीण राऊत यांना मिळाला.

अशी केली तयारी
नांदेडमधील वसंतनगर भागात राहणारे विवेक ताटे यांनी कॉलेजच्या काळापासून व्यायाम शाळेत व्यायाम करत जलतरणिकेत तसेच गोदावरी नदीत पोहण्याचा सराव केला. या सोबतच पुणे येथील मित्रांबरोबर दुर्गभ्रमंती, दऱ्याखोऱ्यात फिरणे आदी काम चालू होते. अभिजित कुपाटे यांच्या ओळखीने त्यांना सायकलिंगची आवड निर्माण झाली.


दोनशे किलोमीटरची सायकलिंग स्पर्धा जिकंली


पन्नास किलोमीटर सायकलिंग करत दोनशे किलोमीटरची सायकलिंग स्पर्धा जिकंली. पुणे येथील संतोष डुकरे यांच्या संपर्कामुळे त्यांनी मॅरेथॉन स्पर्धेत धावण्याचा निश्चय केला. एप्रिलपासून प्रवीण राऊत यांच्यासोबत चालण्याची सवय जडली. पुढे धावण्याचा सराव चालू केला. एक - दोन किलोमीटरनंतर दम लागायचा. त्याच काळात मंत्रालयातील उपसचिव संजय इंगळे यांच्या मार्गदर्शनामुळे दहा ते पंधरा किलोमीटर धावण्याचा सराव झाला. ता. २० ऑक्टोबरला पुणे येथील हाफ मॅरेथॉन स्पर्धा प्रवीण राऊत यांच्यासह इतरांनी भाग घेत त्यांनी पूर्ण केली.

मॅनेथॉनचा मार्ग
सुरवात : गोळेवाडी स्क्वायर - अतकरवाडी गाव - सिंहगड ट्रेकिंग मार्ग - पुणे दरवाजा - देव टाके - कल्याण दरवाजा - नागफनी माउंटेन - विजंरगाव - राज्य महामार्ग ६५ - नदी पास - साखर गाव - गुंजवाने गाव - राजगड किल्ला - पद्मावती माची - सुवेला माची - संजीवनी माची - आलू दरवाजा - राजगड तोरणा ट्रेकिंग मार्ग - तोरणा - बुधला माची - कोकण दरवाजा - तोरणा किल्ला मंदिर - तोरणा डिसेंट - वेल्हे गाव - गुंजवानी डॅमच्या बाजूने - कोंढवले गाव - राज्य महामार्ग ६५ - वेल्हे गाव शाळा पूर्ण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! लोकप्रिय मालिकेच्या सेटवर मोठी दुर्घटना; शुटिंगदरम्यान कॅमेरा असिस्टंटचं निधन

Latest Maharashtra News Updates : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना राहुल गांधींनी केला फोन, काय आहे कारण?

Nitin Gadkari: आमदार निवडताना जात का महत्त्वाची? नितीन गडकरींचा मतदारांना सवाल

Vastu Tips: घरात 'या' ठिकाणी ठेवा मोरपिस, कुटुंबात होईल भरभराट

व्यसनाधीन मुलाच्या त्रासाला कंटाळून बापाने डोक्यात टिकाव घालून मुलाचा केला खून, आदित्यने मुलगी पळवून आणली अन्..

SCROLL FOR NEXT