Buddhist community sakal
मराठवाडा

Buddhist community : सकल बौद्ध व मातंग समाजाच्या वतीने नरसीत आंदोलन : आ. राजेश पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

Buddhist community : सकल बौद्ध व मातंग समाजाच्या वतीने नरसीत आ. राजेश पवार यांच्या वादग्रस्त वक्तव्यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून जोरदार घोषणाबाजी केली आणि बाजारपेठ बंद ठेवली.

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव : नरसी चौकात अण्णा भाऊ साठे यांच्या ऐवजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसला पाहिजे असे वक्तव्य करुन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आ. राजेश पवार यांनी केला. आमदाराच्या या जातीय तेढ निर्माण करण्याच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ सकल बौद्ध व मातंग समाजाच्या वतीने (ता. १५) रोजी रास्तारोको करण्यात आला व त्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी नरसी कडकडीत बंद ठेवण्यात आली होती.

नायगावचे आमदार राजेश पवार हे (ता.११) ऑक्टोंबर रोजी नरसी येथे विकास कामाच्या उदघाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना. नरसी येथील चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ऐवजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवला पाहिजे या मताचा मी आहे असे खळबळजनक वक्तव्य केले.

वास्तविक नरसी चौकातील जागा ही अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याची नियोजित जागा असून वादामुळे सध्या तेथे पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. मात्र आ. पवार यांनी जाणीवपूर्वक चुकीचे वक्तव्य करुन आगीत तेल ओतण्याचा प्रकार करुन बौद्ध आणि मातंग बांधवांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे आ. राजेश पवार यांच्यावर बौध्द आणि मातंग बांधवांच्या भावना दुखावल्या प्रकरणी आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात यावा अन्यथा आ. पवार यांच्या निषेधार्थ (ता.१५) रोजी नरसी बाजारपेठ बंद ठेवून येथील राज्य महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.

पोलीस प्रशासनाने कुठलीच कारवाई केली नसल्याने सकल मातंग व बौद्ध समाजाच्या वतीने (ता.१५) रोजी नरसी बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून चौकात रास्तारोको करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी आ. राजेश पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली त्याचबरोबर त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले.

यावेळी प्रितम गवाले, अनिल शिरसे भारत भालेराव, देविदास सुर्यवंशी, बबलू सुर्यवंशी, साईनाथ कांबळे, सचिन भेदे, गंगाधर कोतेवार, लालबा सुर्यवंशी, जळबा सुर्यवंशी, शिवाजी सुर्यवंशी, दिनेश सुर्यवंशी, बबलू नरसीकर, शुभम भेदे, यादव वाघमारे, श्याम गायकवाड, माधव जमदाडे, राहूल जिगळेकर, अशोक सुर्यवंशी, सुरेश सुर्यवंशी, भाऊराव भेदे, खाकीबा सुर्यवंशी, सय्यद मौला पटेल, रमाकांत सुर्यवंशी इत्यादीसह मोठ्या संख्येने बौद्ध व मातंग बांधव सहभागी होते.

आ. राजेश पवार आणि वाद हा नित्याचाच असून त्यांनी काही दिवसांपूर्वी धर्माबाद येथे लिंगायत समाजाच्या तरुणावर गुन्हे नोंद केले होते. त्यावेळेस धर्माबाद शहरात लिंगायत समाजाने प्रचंड मोठा मोर्चा काढून आमदार राजेश पवार यांचा निषेध नोंदवला होता. तो मोर्चा जिल्हाभर गाजला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SA vs IND 4th T20I: सूर्याने जिंकला टॉस! मालिका विजयासाठी टीम इंडिया, तर द. आफ्रिका बरोबरीसाठी सज्ज; पाहा Playing XI

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

SCROLL FOR NEXT