नायगाव - हक्काप्रती जागरूक असलेले जिल्हा परिषदेच्या शिक्षक विद्यार्थी घडवण्यात मात्र कमी पडत असल्याने शैक्षणिक दर्जा रसातळाला गेला आहे. परिणामी मागच्या दोन वर्षात नायगाव तालुक्यातील तब्बल अडीच हजार विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेला रामराम ठोकला आहे. मोठ्या प्रमाणात गळती लागल्यानंतरही जिल्हा परिषत जागे होत नसल्याने जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनाच शाळा बंद करायच्या नाहीत ना अशी शंका येत आहे.
नायगाव तालुक्यात १ ते १० पर्यंतच्या १०७ जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत पण येथे दर्जेदार शिक्षणाचा अभाव दिसून येते. शासन स्तरावरुन अनेक प्रकारच्या भौतिक सुविधा उपलब्ध होत आहेत. परंतु त्याचा वापर करुन विद्यार्थी घडवण्यात शिक्षक कमी पडत आहेत.
जिल्हा परिषदेच्या शाळेलाही एक इतिहास होता याच जिल्हा परिषदेच्या शाळेतून अनेक राजकीय नेते घडले. कुणी देशाचे, कुणी राज्याचे तर कुणी प्रशासकीय सेवेत आपला दबदबा निर्माण केला. सर्व एका काळात याच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले आहेत. कालांतराने बदल झाला असला तरी आता साने गुरुजींची जागा नाने गुरुजींनी घेतल्या शिक्षण विभागाची वाईट अवस्था झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाला आजच्या परिस्थिती ८० हजार ते १ लाखापर्यंत पगार मिळतो पण मिळणाऱ्या पगारापुरतेही शिकवत नसल्याने वाईट वाटत आहे. कारण तालुक्यातील दुरच्या शाळेत शिक्षक नियमितपणे जात नाहीत, जे जातात ते टपालाच्या नावाखाली अर्धी शाळा करुन डुम्मे मारतात, तर काही शिक्षक शाळेचे दिवस वाटून घेतात.
त्याचबरोबर असंख्य शिक्षक राजकीय नेत्यांची हुजरेगिरी करुन पाहिजे त्या ठिकाणी व पाहिजे ती शाळा मिळवता. एकदा सोईची शाळा मिळाली की राजकारण करण्यात व्यस्त असतात. एक ना अनेक कारणांमुळे शिक्षकांनीच शिक्षण व्यवस्थेची अक्षरशः वाट लावल्याने मागच्या दोन वर्षात तब्बल आडीच हजार विद्यार्थ्यांनी काढता पाय घेतला आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेतील वरचेवर विद्यार्थी संख्या कमी होत असल्याने याचा फटका शिक्षकांनाच बसणार आहे पण विद्यार्थी संख्या टिकली पाहिजे यासाठी कुणीही प्रयत्न करताना दिसत नाहीत. सन २०२१-२२ यु डायस नुसार विद्यार्थी संख्या १२ हजार ९७३ होती.
सन २०२२-२४ मध्ये ११ हजार ४७१ तर २०२३-२४ मध्ये विद्यार्थी संख्या १० हजार ५०० वर आली आहे. केवळ दोन वर्षात तब्बल आडीच हजार विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेला रामराम ठोकला आह. हक्काप्रती जागरूक असलेले जिल्हा परिषदेचे शिक्षक आपल्याच वर्गातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी त्यांचा प्रयत्न नसतो हे विशेष.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.