NCP chief sharad pawar rally in beed
बीड- शेवटपर्यंत शरद पवार साहेबांच्या पायाशी राहीन, अशी भावना राष्ट्रवादीचे नेते संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केली. ते बीडमधील सभेत बोलत बोते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज बीडमध्ये सभा घेत आहेत. पवार आज आपली भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
मला लोकांनी प्रश्न विचारला 'सत्ता की साहेब', प्रश्न संपायच्या आधी मी उत्तर दिलं. मी विचार सु्द्धा केला नाही. मी शरद पवारांसोबत राहीन. त्यांच्या पाया पाशीच राहीन, असं संदीप क्षीरसागर म्हणाले आहेत. शरद पवार यांच्या सभेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बीडमध्ये जमा झाले आहे. यावेळी नेत्यांनी आवेषपूर्ण भाषणं केली.
सत्तेमधून आम्ही ठराविक आमदार बाहेर पडलो होतो. काही आमदार आम्हाला म्हणाले आम्ही सत्तेमध्ये आहोत, आमच्यासोबत पंतप्रधान मोदी आहेत, तुमच्याकडे काय आहे. मी म्हणालो माझ्याकडे पवार साहेब आहेत. बीड आणि मराठवाड्याची जनता स्वाभिमानी आहे. कोणी इकडे तिकडे गेलं तरी आयुष्यभर तुमच्यासोबत तुमच्या विचारासोबत जोडून राहणार, अशी भूमिका संदीप क्षीरसागर यांनी मांडली.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. अजित पवार सत्ताधारी पक्षासोबत गेलेत. शरद पवार यांनीही सत्तेत सामील व्हावे यासाठी अजित पवार गट प्रयत्नशील असल्याचं सांगितलं जातंय. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात दोन दिवसांपूर्वी भेट झाली होती. त्यामुळे ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालाय. त्यामुळे शरद पवार याबाबत काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.