Suresh Birajdar sakal
मराठवाडा

Suresh Birajdar : संघर्षाच्या काळात अजित पवार यांच्या पाठीशी शक्ती उभारण्याची गरज

धाराशिव लोकसभा मतदारसंघात मागील सहा महिन्यापासून आपण लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली होती.

अविनाश काळे

धाराशिव - धाराशिव लोकसभा मतदारसंघात मागील सहा महिन्यापासून आपण लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. सर्वसामान्य नागरिकांसह विविध क्षेत्रातील सर्वपक्षीय व्यक्तींचा याला भरभरून प्रतिसाद मिळत होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा उमेदवाराबाबत जो निर्णय घेतलेला आहे तो आपणा सर्वांना मान्य करावा लागणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजीनामा देणे किंवा सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने व्यक्त होऊन नाराजी व्यक्त करण्याचा प्रकार तात्काळ थांबवावेत, कार्यकर्त्यांनी संयम बाळगाव अशी सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

धाराशिव येथे शुक्रवारी (ता. पाच) सायंकाळी धाराशिव येथे मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीच्या सुरुवातीला अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. मागील सहा महिन्यापासून लोकसभा निवडणुकीची तयारी करून ऐनवेळी उमेदवारी निश्चित करण्याच्या वेळी मात्र प्रा. बिराजदार यांना डावलून इतर पक्षातील इच्छुक उमेदवारास पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.

मागील ४o वर्षापासून एकनिष्ठ राहून पक्ष अडचणीत असताना पक्ष संघटना वाढवण्याचे नि:स्वार्थपणे काम करणाऱ्या बिराजदार यांच्या सोबत असा प्रकार घडत असेल तर पक्षात राहणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची काय स्थिती असेल अशी भीती या वेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

पदाधिकाऱ्यांच्या भावना ऐकून प्रा. बिराजदार म्हणाले की, अजित पवार यांचा विकासात्मक दृष्टिकोन पाहून आपण आज तागायत त्यांच्या समवेत काम करत आहोत. राज्याला त्यांच्यासारख्या विकासाभिमुख नेतृत्वाची आवश्यकता आहे. त्यांना संघर्षाच्या काळात एकटे पाडण्याचे प्रयत्न होत आहेत, आपण सर्वजण त्यांचे कुटुंबीय बनून त्यांना साथ देण्याची गरज आहे.

पुढील काही दिवसात पवार आपल्याशी संवाद साधणार आहेत, त्यामुळे यापुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजीनामा देणे किंवा सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने व्यक्त होऊन नाराजी व्यक्त करणे हे प्रकार तात्काळ थांबवावेत अशा सुचना कार्यकर्त्याना दिल्या आहेत.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील, ज्येष्ठ नेते भास्कर खोसे, युवक जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे, पदवीधर विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन बागल,जिल्हा कार्याध्यक्ष अँड. प्रवीण यादव, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत नवगिरे, जिल्हाध्यक्ष असद पठाण, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब स्वामी, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंखे, सोशल मीडिया माजी जिल्हाध्यक्ष सुहास मेटे, सेवादल जिल्हाध्यक्ष सतीश घोडेराव, योग जिल्हा कार्याध्यक्ष मनोज जगताप, वाशी तालुकाध्यक्ष अँड. सूर्यकांत सांडसे, लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंखे, भूम तालुका अध्यक्ष अँड. रामराजे साळुंखे, बार्शी तालुकाध्यक्ष विक्रम सावळे, तुळजापूर तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवंशी, उमरगा तालुकाध्यक्ष बाबा जाफरी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य किशोर साठे, उमरगा लोहारा विधानसभा अध्यक्ष विजयकुमार लोमटे, लोहारा शहराध्यक्ष आयुब शेख, जिल्हा उपाध्यक्ष बाबा शेख, नगरसेवक भागवत कवडे,  जालिंदर कोकणे, जयंत देशमुख, प्रशांत सोमवंशी, वैजनाथ कागे, बार्शी शहराध्यक्ष संताजी सावंत, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अमोल बदे, सरपंच महिला जिल्हा उपाध्यक्ष सुनिताताई पावशेरे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राजकीय पक्ष मेले तरी... निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य, शरद पवारांवरही घणाघात

Maratha Reservation: सरकार नालायक, तरुण जीव संपवतायेत; मनोज जरांगेंचा संताप....!

Latest Maharashtra News Updates : मनसे पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

Milind Soman runs barefoot: मिलिंद सोमण नुकतेच धुक्यात अनवाणी पायांनी पळताना दिसले. पण खरंच हे शास्त्रीय दृष्ट्या बरोबर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात.

IPL 2025: मुंबईचा कोच आता RCB मध्ये सामील; 18 व्या हंगामात सांभाळणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT