NEET Exam esakal
मराठवाडा

NEET Exam : ‘नीट परीक्षा’ पेपरफुटीप्रकरणी लातूरचा तपास ‘सीबीआय’कडे?

‘नीट’ परीक्षा पेपरफुटीप्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) देण्यात येणार असून यासंदर्भात राज्य सरकारकडून हालचालींना वेग आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

लातूर - ‘नीट’ परीक्षा पेपरफुटीप्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) देण्यात येणार असून यासंदर्भात राज्य सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. तसा प्रस्तावही केंद्र शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

देशभर सध्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण गाजत आहे. त्याचे धागेदोरे लातूरपर्यंत पोचले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी शिक्षक असलेल्या जलिल पठाण आणि संजय जाधव या दोघांना अटक केली होती. दोघांनाही दोन जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दोघांची आणखी पाच दिवस कोठडी शिल्लक आहे. असे असताना अचानक पोलिसांनी या दोघांना न्यायालयात आणले होते.

या दोघांची कोठडी ‘सरेंडर’ करण्यासाठी त्यांना न्यायालयात नेल्याची चर्चा होती. कायद्यानुसार अशी कोठडी ‘सरेंडर’ करून नंतर पुन्हा गरज पडल्यास ती घेता येते, असेही पोलिसांचे म्हणणे होते. पण यासंदर्भात सरकारी वकिलांशी चर्चा केल्यानंतर पोलिसांनी दोघांना पुन्हा ठाण्यात नेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT