File photo 
मराठवाडा

पाठीवरील ओझ्याने वाकतेय नवीन पिढी

सकाळ वृत्तसेवा

नांदेड :  मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करणार, अशा घोषणा दरवर्षीच सरकारकडून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर होतात. त्यासाठीच्या सूचनाही दिल्या जातात. त्यानुसार अनेक शाळा त्यांच्या पातळीवर ओझे कमी करण्याचे प्रयोगही राबवतात. मात्र, त्यात सातत्य नसल्याने आजही मुलांच्या पाठीवरचे ओझे कमी झाले नसल्याने नवीन दिवसेंदिवस वाकत चालली आहे.  

ई-लर्निंगचा वापर वाढवला पाहिजे
जीवघेण्या स्पर्धेच्या काळात पालकांच्या अपेक्षाने विद्यार्थी तर दबला जातोच, शिवाय वह्या-पुस्तके, टिफीन आणि वाॅटर बॅगच्या ओझ्यानेही आजचा विद्यार्थी दबला जात आहे. काही शिक्षकांनी सांगितल्या की, शासनाच्या या सूचना आम्हाला मान्य आहेत, परंतु, वर्गातल्या कपाटात वह्या-पुस्तके ठेवली, तर तासाला आल्यावर ती विद्यार्थ्यांना वाटण्यात आणि तास संपल्यावर पुन्हा जमा करण्यातच खूप वेळ जातो.

३० मिनिटांच्या तासिकेतला निम्मा वेळ त्यातच गेला, तर आम्हाला शिकवायला किती वेळ मिळणार. विद्यार्थ्यासाठी आम्ही ई-लर्निंगचा एक पर्याय वापरत आहोत. आठवड्यातले काही तास ई-लर्निंगचे असतात, त्या दिवशी विद्यार्थ्यांना त्या विषयाच्या वही-पुस्तकाची फारशी गरज पडत नाही. या प्रयोगामुळे किमान आठवड्यातले दोन दिवस तरी काही विषयांच्या वह्या-पुस्तकांचे ओझे कमी होऊ शकते.

शिक्षण विभागाने कठोर पावले उचलावीत
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी शाळेकडून आम्ही अनेक प्रयत्न करून पाहिल्याचे काही शिक्षकांनी सांगितले. असे असले तरी शिक्षण विभागाने प्रत्यक्ष शाळेत येऊन, याबाबत काय अडचणी आहेत, ते पाहणे आवश्यक आहे. तरच या अडचणीवर काही मार्ग निघू शकेल, असेही शिक्षकांचे मत आहे.

राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी संशोधन करून २०१५ मध्ये काही उपाययोजना जाहीर केल्या. मात्र, त्याची अमलबजावणी होत नसल्याने, तसेच शिक्षणविभागाकडे तपासणी करण्यासाठीची यंत्रणा नसल्याने दप्तराचे ओझे कायमच बघायला मिळत आहे.
 
अशा आहेत उपाययोजना

  1. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे, विद्यार्थ्यांच्या वजनाच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त असू नयेत.
  2. चित्रकला, हस्तकला, कार्यानुभव, संगणक या विषयांच्या वह्या शाळेतच ठेवण्याची व्यवस्था करावी
  3. शाळेत ग्रंथालयासारखे दप्तरालय सुरु करावे.
  4. पहिली आणि दुसरीसाठी गृहपाठ वह्यांची आवश्यकता नाही.

शाळेत लाॅकर सिस्टीम असावी
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सर्व वह्या-पुस्तके रोज शाळेतच ठेवली पाहिजेत. ज्या विषयांचा गृहपाठ दिला असेल, त्याच विषयांच्या वह्या आणि पुस्तके विद्यार्थ्यांना घरी द्यायला पाहिजे. वास्तविक पाहता भरमसाठ वार्षिक शुल्क घेऊनही शाळेतच वह्या-पुस्तके ठेवण्यासाठी शाळांमध्ये लाॅकर्सची सोय नसते. ती उपलब्ध करून द्यावी.
- सु्दर्शन सोनकांबळे, नांदेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: चंद्रचूड साहेब न्याय देण्याऐवजी टिप्पणीकार झाले होते; उद्धव ठाकरेंनी माजी सरन्यायाधीशांवर व्यक्त केली नाराजी

"आम्ही धनगर समाजाचा मुख्यमंत्री करून न्याय दिला, मात्र महाराष्ट्रात धनगरांना साधं आरक्षण दिलं जात नाही"

मोठी बातमी: रोहित शर्मा पहिल्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियात होतोय दाखल, सोबत भारी गोलंदाजही टीम इंडियाच्या मदतीला येतोय

Israel PM Netanyahu: इस्रायली पंतप्रधानांच्या घरावर बॉम्ब हल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, आता हद्द झाली...

Latest Maharashtra News Updates live : बाळासाहेब ठाकरे पुतळ्याला शिवसेना (उबाठा) पक्षाचे अभिवादन

SCROLL FOR NEXT