File photo 
मराठवाडा

लातूर जिल्ह्यातील ९ तालुक्यांत कोरोनाचा शिरकाव

सुशांत सांगवे

लातूर : एकाच दिवशी तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी तब्बल ३८ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची धक्कादायक माहिती आरोग्य विभागाने जाहीर केली. ३८ पैकी १९ जणांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल रविवारी (ता. ५) रात्री, तर उर्वरित १९ जणांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल सोमवारी (ता. सहा) दुपारी जाहीर करण्यात आला. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे लातूरकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

दरम्यान, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिवपूर येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने लातुरातील ९ तालुक्यांत कोरोनाचा शिरकाव झाल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.  विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील प्रयोगशाळेत रविवारी दिवसभरात २४० व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. यापैकी तब्बल १६४ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले, तर १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

३५ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. या प्रलंबित अहवालांमध्ये आणखी १९ जणांचे अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ४७८ झाली आहे. त्यातील २०७ जणांवर उपचार सुरू आहेत. तर २४७ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. उपचारादरम्यान आजवर २४ जणांचा मृत्यू झाला आहे. 

शहरातील आणि जिल्ह्यातील १९ जणांचा रविवारी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये शहरातील लोखंड गल्लीमधील दोन, तर काळे गल्ली, तेली गल्ली, बसवेश्वर चौक, वीर हणमंतवाडी, मोतीनगर, नवीन रेणापूर नाका, विराट हनुमान रस्ता, झिंगणप्पा गल्ली, खोरी गल्ली, भाग्यनगर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

याशिवाय, निलंगा येथील हैदतीयान नगर, शिरूर अनंतपाळमधील शिवपूर, औसा येथील ढोर गल्ली, औसा तालुक्यातील खडकपुरा, लातूर तालुक्यातील चांडेश्वर, अहदमपूरमधील थोडगा रस्ता आणि अहमदपूर या भागांत प्रत्येकी एक रुग्ण आहे. प्रलंबित अहवालामधून सोमवारी (ता. सहा) पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये निलंगा येथील दत्तनगर आणि इंदिरा चौक भागातील तब्बल १६ जणांचा समावेश आहे. तर लातूरमधील तिघांचा समावेश आहे.

लातूर जिल्ह्यातील लातूर, उदगीर, जळकोट, निलंगा, औसा, अहमदपूर, चाकूर, रेणापूर या ८ तालुक्यांत कोरोनाने शिरकाव केला होता. आता शिरूर अनंतपाळमधील शिवपूर येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे कोरोना ९ तालुक्यांपर्यंत पसरला आहे, हे स्पष्ट झाले आहे. सध्या देवणी या एकमेव तालुक्यात अद्याप कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है'वर राहुल गांधींची मार्मिक टिप्पणी; 'सेफ'मधून अदानी-मोदींचा फोटो काढत केलं 'लक्ष्य'

Maharashtra Weather Update: तापमानात घट, महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार! जाणून घ्या हवामानाची स्थिती

मी बोलायला लागलो, तर घड्याळवाल्यांचा 'कार्यक्रमच' होईल; जयंत पाटलांचा अजितदादा गटाला थेट इशारा

Hypersonic Missile : एका सेकंदात 3.087 KM स्पीड, अर्धा चीन अन् पूर्ण पाकिस्तान रेंजमध्ये, जाणून घ्या भारताच्या नव्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची ताकद

अभिनेत्री कश्मिरा शाहचा भयानक अपघात; रक्ताने माखले कपडे; पोस्ट शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT