Nanded News 
मराठवाडा

वर्तमानपत्रच आहे जीवाभावाचा मित्र

प्रमोद चौधरी

नांदेड : गेले काही दिवस लोक आपापल्या घरात बसून आहेत. लोक आयुष्यात पहिल्यांदाच घरात दीर्घकाळ बसून राहण्याचा अनुभव घेत आहेत. दिवसभर दूरदर्शन आणि खाजगी वाहिन्यांवरील बातम्या पाहून कंटाळत आहेत. वेळ कसा घालवायचा? हा प्रश्न त्यांच्यासमोर पडत आहे. अशा वेळी ख-या अर्थाने वर्तमानपत्रे हीच जीवाभावाच्या मित्राची भूमिका बजावू शकतात. सुखदु:खाच्या चार गोष्टी विश्वासाने सांगू शकतात.

सध्या जगभर कोरोना नावाच्या विषाणूंनी भयंकर धुमाकूळ घातलेला आहे. हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत. या विषाणूंनी आता भारतातही शिरकाव केला आहे. महाराष्ट्रात देखील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यावर खबरदारीचा उपाय म्हणून पंतप्रधानांनी देशभर लाॅक डाऊनचे आदेश दिलेले आहेत. या काळात वर्तमानपत्राची भूमिका महत्त्वाची आहे.  खरे तर घरातील ज्येष्ठांच्या वाचनाची पूर्ती करण्यासाठी आजचा काळ खूप फायदेशीर आहे. तसेच मुलांमध्ये वाचन संस्कृती निर्माण करण्यासाठी हा काळ सोन्यासारखा आहे. या काळात मुलांमध्ये वर्तमानपत्र वाचनाची आवड निर्माण करता येऊ शकते. या वाचनातून मुलांची अभिरुची आणि विचार कक्षा रुंदावता येतात.

वास्तविक पाहता ज्या ज्या वेळी देशावर संकटे आली त्या वेळी वर्तमानपत्रांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. लोकप्रबोधनाची फार मोठी जबाबदारी निभावलेली आहे. यापूर्वी ज्या युध्दांची आव्हाने देशाने स्विकारली, त्याच्या वस्तुनिष्ठ बातम्या सामान्य जनांपर्यंत पोचविण्याचे काम वर्तमानपत्रांनीच केले आहे. आज सुध्दा कोरोना या विषाणू विरूद्ध एक युध्द आपण लढतो आहोत. एका राक्षशी विषाणूने अख्या जगापुढे फार मोठे आव्हान निर्माण केले आहे.  

खरे तर इलेक्ट्रॉनिक मिडिया कितीही गतिमान असला तरी तपशिलाच्या बाबतीत खूपच तोकडा पडतो. कोणी, का, कसे, केव्हा अशा सा-याच प्रश्र्नांची समाधानकारक उत्तरे देण्याइतका अवधी या माध्यमाकडे खचीतच नसतो. ही या माध्यमाची मोठी मर्यादा म्हटली पाहिजे. वर्तमानपत्राचे असे नसते. वाचकाच्या सर्व शंकांचे समाधान होईल इतकी परिपूर्ण बातमी छापण्याचे साहस ते करते. दुसरी गोष्ट विश्वासार्हतेला कुठेही तडा जाऊ नये याची काळजी घेते. आज कोरोनाच्या महाभयंकर संकटात जग, देश, राज्य, जिल्हा आणि गाव-परिसरातील घडामोडींचे वर्तमान वर्तमानपत्रांच्या माध्यमातून आपणाला घरबसल्या कळू शकते.  

लॉकडाऊनच्या काळात वर्तमानपत्र विकत घेऊन वाचणे ही उत्तम सवय लावून घ्यायला हवी. एक विवेकशील, सुजाण, सुसंस्कृत नागरिक म्हणून आपल्या व्यक्तीमत्वाला हवे तसे पैलू पाडण्यासाठी चालून आलेली ही संधी आहे, असा विचार करून आपण घरात बसून राहणे पसंत केले आणि वर्तमानपत्र वाचत बसलो तर अनेक प्रश्नांची उत्तरे सहज मिळू शकतील.
- डॉ. जगदीश कदम (ज्येष्ठ साहित्यिक, नांदेड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसरमध्ये इमारतीला भीषण आग

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

Instagram Reels: इंस्टाग्राम रील्सवर 1 मिलियन व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतात? रक्कम जाणून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT