निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन पाण्यात sakal
मराठवाडा

Killari Rain Update : किल्लारीत मुसळधार, तेरणा नदीला पूर; निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन पाण्यात

किल्लारी (ता. औसा) भागात शनिवारी (ता. पाच) पहाटे, तसेच शुक्रवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे निलंगा तालुक्यातील सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ओढे, नाले तुडूंब भरून वाहत असल्याने तेरणा नदीला पूर आला आहे. तेरणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

सकाळ वृत्तसेवा

निलंगा : किल्लारी (ता. औसा) भागात शनिवारी (ता. पाच) पहाटे, तसेच शुक्रवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे निलंगा तालुक्यातील सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ओढे, नाले तुडूंब भरून वाहत असल्याने तेरणा नदीला पूर आला आहे. तेरणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

सध्या पावसाने कहर केला असून दिवसभर उघडीप दिली जाते; तर रात्री जोरदार पाऊस होत आहे. सध्या सोयाबीन पीक काढणीला आले असून, यंदा पेरणी वेळेवर झाल्यामुळे पीक परिस्थिती समाधानकारक आहे. तालुक्यातील मध्यम प्रकल्प, लघू प्रकल्प पूर्णतः भरले आहेत तर मांजरा नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे.

शुक्रवारी रात्री सुरू झालेली पावसाची रिपरिप सकाळपर्यंत सुरू होती. त्यामुळे किल्लारी (ता. औसा) भागात अतिवृष्टी झाली असून, याचा फटका निलंगा तालुक्याला बसला आहे. तेरणा नदीला पूर आल्याने सांगवी-जेवरी, बामणी, धानोरा, लिंबाळा, येळणूर, गुंजरगा यासह आदी गावातील नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन काढून ठेवलेले पीक पाण्यात आहेत.

शिवाय काढणी न झालेल्या सोयाबीन, तूर या पिकात पाणी साचल्याने व काही पिके पुरात गेल्याने दोन्ही पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पाऊस थांबत नाही दिवसभर पावसाचा खंड असला तरी रात्री मोठा पाऊस पडत असल्याने काढणीला आलेले पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

ओढे, नाले तुडूंब भरून वाहत असून, काही गावातील शेतकरी शेताला न जाता पूर ओसरण्याची वाट पाहत आहेत. तालुक्यातील मदनसुरी, रामतीर्थ, कोकळगाव, सरवडीसह आदी भागाला पावसाचा फटका बसला आहे. या नुकसानीची पाहणी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी अनिल शेळके यांनी पाहणी केली. यावेळी मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Latest Maharashtra News Updates : एक्झिट पोलनुसार महायुतीचे सरकार स्थापन होणार : रामदास आठवले

SCROLL FOR NEXT