परभणी : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर इयत्ता नववी व अकरावी परीक्षेसंदर्भात १५ एप्रिलनंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे राज्याच्या शिक्षण विभागाने जाहीर केल्याची माहिती येथील शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
‘कोरोना’च्या उद्रेकामुळे आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच नववी व आकरावीच्या परीक्षादेखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, त्याची निश्चित तारीख जाहीर झाली नसल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत. तसेच दहावीचादेखील भूगोल विषयाचा अखरेचा पेपर पुढे ढकला आहे. त्यामुळे या परीक्षा कधी होणार, याकडे लक्ष लागले आहे. सुरवातीला या परीक्षा ता. ३१ मार्चनंतर निर्णय घेण्यात येईल, असे शिक्षण विभागाने जाहीर केले होते. परंतु, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ता. १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे उर्वरीत परीक्षा आता ता. १५ एप्रिलनंतर घेण्यात येईल, असे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे.
हेही वाचा - नागरिकांना भाजीपाल्यापासून रहावे लागते वंचित
शिक्षकांना उत्तरपत्रिका घरी नेण्याची मुभा
तसेच लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मुख्याध्यापकांकडून शिक्षकांना दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी नेण्याची मुभा देण्यात आली आहे. ‘कोरोना’च्या पाश्र्वभूमीवर व संचारबंदीमुळे ता. १५ एप्रिलनंतर झाल्यानंतर शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी नेता येतील, असे मंडळाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी जाहीर केल्याची माहिती डॉ. पाटेकर यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळणार
शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार देणे आवश्यक असल्याने शाळेत शिल्लक असलेला पोषण आहापातील तांदूळ, डाळी, कडधान्याचे वाटप टप्प्याटप्प्याने शाळेत गर्दी न करता करण्याचे आदेश विद्यार्थ्यांना वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या बाबतचे आदेश महाराष्ट्र शासनाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी काढले आहेत. ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा, अंगणवाडी बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
हेही वाचा - पंजाब, हरियाणाचे तीन हजार शीख यात्रेकरू नांदेडात अडकले
नियोजन करणे बंधनकारक
विद्यार्थी, लहान बालके पोषण आहारापासून वंचित राहात असल्याने सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे याचिका दाखल केली होती. त्यानुसार न्यायालयाने विद्यार्थ्यांचे पोषण होण्याच्या दृष्टीने पोषण आहार देणे गरजेचे असल्याचे मत मांडल्यानंतर ग्रामीण भागातील शाळा स्तरावर शालेय पोषण आहार योजनेतून पुरवठा करण्यात आलेले तांदूळ, डाळी, कडधान्याचे वितरण विद्यार्थ्यांना तसेच हंगामी वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळेचे मुख्याध्यापक, योजनेचे काम पाहणारे शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी शिल्लक साठा शाळेतील विद्यार्थ्यांना व वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटप होईल याचे नियोजन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
वितरण करताना जिल्हाधिकारी यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देण्यात आलेल्या आदेशाचे व सुचनेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे बजावण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.