Nanded News 
मराठवाडा

‘या’ शहराचा कारभार चालतोय रामभरोसे 

प्रमोद चौधरी

नांदेड : मालेगाव रोडवरून पुर्णा येथे जाण्यासाठी जैन मंदिर ते छत्रपती चौक असा अंतर्गत जोड रस्ता तयार करण्यात आला आहे. याच रस्त्यावरील नालीवर नुकताच बांधण्यात आलेला पुल दर्जाहिन तयार केल्याने दोनच दिवसात कोसळला. यावरून महापालिकेचा कारभार कसा रामभरोसे चालतोय हे चव्हाट्यावर आले आहे. 

नांदेडकरांच्या सहनशक्तीला सलाम                                                  जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजना केंद्र आणि राज्यशासनाच्या सहकार्याने २००७ पासून नांदेड शहरात राबविली जात आहे. शहरी भागातील नागरिकांना मूलभूत सोयी पुरविणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. प्रत्यक्षात शहर पालथे घातल्यानंतर मात्र डोके सुन्न झाल्याशिवाय राहणार नाही. मुख्य रस्ते तर जागोजागी उखडलेले आहेतच; पण त्याहून दयनीय आणि चिंताजनक अवस्था शहराच्या अंतर्गत भागात पाहायला मिळते. महापालिकेची निष्क्रियता आणि बेजबाबदारी वर्षानुवर्षे मुकाटपणे खपवून घेणाऱ्या सामान्य नांदेडकरांच्या सहनशक्तीला सलाम.

हेही वाचा - मराठवाड्यातील ‘या’ रुग्णालयात होणार लिवर प्रत्यारोपन
 
रस्ते असेच बांधतात?
शहरातील मुख्य रस्त्यांसह लोहमार्ग आणि नद्या, नाल्यांवरील पूल; तसेच अंतर्गत भागातील काही प्रमुख रस्ते ‘जेएनएनयुआरएम’ या योजनेतून महापालिकेने बांधले; पण या कामाच्या दर्जाचे धिंडवडे निघतात. देशात दर्जेदार अभियंत्यांची कमतरता नाही; पण कदाचित दुर्दैवाने नांदेड महापालिकेला ते लाभले नाहीत. परिणामी शिवाजीनगर ओव्हरब्रीज बांधला खरा; पण मिलगेटला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली. हिंगोली गेट ओव्हरब्रीजच्या जोडरस्त्याचे हाल झाले आहेत. व्हीआयपी मार्ग नावापुरताच व्हीआयपी ठरत आहे. ठिकठिकाणी हा रस्ता उखळला असून कायम दुरुस्तीचे काम सुरू असते. दत्तनगर, मगनपुरा, आनंदनगर, भाग्यनगर, इतवारा, तरोडा नाका, लेबर कॉलनी, शोभानगर, आंबेडकरनगर, गणेशनगर, मालेगाव रोड, कॅनॉल रोड अशा सर्वच भागांत अंतर्गत रस्ते तर असून नसल्यासारखे आहेत.

नाल्यांची गरजच वाटत नाही!
सांडपाणी आणि पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्या प्रत्येकच रस्त्याचे आयुष्य वाढवीत असतात; पण नांदेड महापालिकेला रस्ते बांधताना नाल्या, गटार बांधण्याची आवश्‍यकताच वाटली नाही. परिणामी सर्व प्रमुख रस्त्यांप्रमाणेच अंतर्गत रस्त्यांवरही पाणी साचते. नुकतेच जैन मंदिर ते छत्रपती रोड या अंतर्गत जोड रस्त्यावरील नालीवर पूल बांधण्याचे काम सुरु होते. हा पुल बांधायला चक्क दोन महिने लागलेत. पुल बांधल्यानंतर दोनच दिवसात म्हणजे शुक्रवारी (ता.१३ डिसेंबर २०१९) एक कंटेनर त्यावरून गेला अन् सदर पुल कोसळलाच; शिवाय कंटनेरही एका बाजूने झुकला. यावरून महापालिकेच्या कामाचा आणि हे काम बघणाऱ्या कारभाऱ्याच्या कामाचा संशय बळावल्याशिवाय राहणार नाही. 

हेही वाचलेच पाहिजे - नांदेडमधील रिकाम्या भूखंडाचे होते काय?

स्वच्छतेबाबत महापालिका उदासीन
कचऱ्याच्या कंत्राटाबाबत अभूतपूर्व संशयकल्लोळ उडवून देणारी महापालिका शहरातील दैनंदिन साफसफाईबाबत मात्र कमालीची उदासीन दिसते. दिखाऊपणासाठी मुख्य रस्ते झाडले जातात आणि ठराविक वसाहतींत कचरा संकलित केला जातो. तोदेखील नियमित नाही. अंतर्गत भागात तर आनंदी आनंदच आहे. शहराच्या विविध भागांत कचऱ्याचे कुप्पे, भरून उलथणाऱ्या कचराकुंड्या सर्रास पाहायला मिळतात. लागून असलेल्या वेगवेगळ्या निवासी संकुलांच्या मधील चिंचोळ्या जागा तर अतिशय अस्वच्छ आणि धोकादायक बनल्या आहेत. महापालिकेची ही उदासीनता सामान्यांच्या आरोग्यासाठी जीवघेणी बनत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT