file photo 
मराठवाडा

मराठवाड्यातील ३३ तालुक्यांत पेरणीची घाई नको

कैलास चव्हाण

परभणी : मराठवाड्यात पुढील पाच दिवसांत आकाश ढगाळ राहून ता.१६ रोजी मेघगर्जना व विजांच्‍या कडाक्‍यासह जोरदार पावसाची शक्‍यता आहे. दरम्यान, मराठवाड्यातील ३२ तालुक्यांत अद्याप पेरणीची घाई करा नका, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाने दिला आहे.
मराठवाड्यात ता.११ रोजी मान्सूनचे आगमन झाले आहे. सुरवातीला दोन दिवस अनेक भागात दमदार असा पाऊस झाला आहे. काही भागांत पुरस्थिती उद्‍भवली होती, तर काही भागात अजूनही पेरणी योग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरणीयोग्‍य पाऊस (७५ मिमी पेक्षा जास्‍त) झाला असल्‍यास वापसा येताच जमिनीत पुरेसा ओलावा असल्‍याची खात्री करून बीजप्रक्रिया करूनच पिकांची पेरणी करावी, असा सल्ला कृषी विद्यापीठाने दिला आहे. अजुनही मराठवाड्यातील ३३ तालुक्यांत ७५ मिलिमीटरपेक्षा कमी पावसाची नोंद असल्याने तेथे मोठा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नका, असा सल्ला विद्यापीठाने दिला आहे.

हेही वाचा :​ ३६ हजार शेतकऱ्यांचा कापूस शिल्लक


या तालुक्यांत पेरणीची घाई नको
(बीड जिल्‍हा : बीड, धारूर, परळी, शिरूर कासार, वडवणी हिंगोली जिल्‍हा : वसमत, जालना जिल्‍हा: जालना, घनसांगवी, मंठा, परतूर, लातूर जिल्‍हा : जळकोट, चाकूर, निलंगा, उदगीर, नांदेड जिल्‍हा : अर्धापूर, बिलोली, देगलूर, हदगाव, कंधार, किनवट, लोहा, मुदखेड, नायगाव, उस्‍मानाबाद जिल्‍हा : उस्‍मानाबाद, लोहारा, परांडा, तुळजापूर, उमरगा व परभणी जिल्‍हा : गंगाखेड, जिंतूर, पूर्णा, सोनपेठ) येथे पेरणीची घाई करू नये.

हेही वाचा :​ कोरोना अपडेट - नांदेडला दिवसभरात २४ व्यक्ती कोरोनाबाधित

अशी करा बीजप्रक्रिया
खरिपात पेरणी करताना बीजप्रकिया करूनच पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे. कपाशी बियाणास थारयम किंवा कॅप्‍टन तीन ग्रॅम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणात मिसळून बीजप्रक्रिया करावी. अॅझोटोबॅक्‍टर आणि स्‍फुरद विरघळविणारे जिवाणू प्रत्‍येकी २५० ग्रॅम प्रति दहा किलो बियाणांवर बीजप्रक्रिया करावी. बियाणे अर्धा तास सावलीत सुकवून पेरणी करावी. सोयाबीन बियाणास पेरणीपूर्वी कार्बोक्झिम (३७.५ टक्के) + थायरम (३७.५ टक्के) डीएस (मिश्र घटक) या बुरशीनाशकाची तीन ग्रॅम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी. तसेच ट्रायकोडर्मा (८–१०ग्रॅम / कि.ग्रॅ. बियाणे) चा सुद्धा यासाठी वापर करावा. या बुरशीनाशकांच्‍या बीजप्रक्रियेनंतर बियाणास रायझोबियम जिवाणू खत (ब्रेडी रायझोबियम) + स्‍फुरद विरघळविणारे जिवाणू खताची (पीएसबी) २५० ग्रॅम प्रति दहा किलो किंवा १०० मिली / दहा किलो ग्रॅम (द्रवरूप असेल तर) याची बीजप्रक्रिया करावी. त्‍यानंतर बियाणे सावलीमध्‍ये वाळवून शक्‍य तेवढ्या लवकर पेरणी करावी. तूर बियाणास पेरणीपूर्वी कार्बोक्झिम (३७.५ टक्के) + थायरम (३७.५ टक्के) डीएस (मिश्र घटक) या बुरशीनाशकाची तीन ग्रॅम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी. तसेच ट्रायकोडर्मा दहा ग्रॅम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी. त्‍यानंतर रायझोबियम जिवाणूसंवर्धक + स्‍फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धक (पीएसबी) २५० ग्रॅम प्रति दहा किलो बियाणास लावून सावलीत वाळवूण पेरणी करावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT