परभणी : महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाने परभणी शहरातील ६२१ मालमत्ताधारकांना नोटीस बजावल्या आहेत. यामुळे व्यापारी वर्गात प्रचंड खळबळ उडाली आहे. मे आणि ऑगस्ट महिन्यात या नोटीस काढण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये या मालमत्तांवर बेकायदेशीर ताबा असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद यांच्या सहीने जारी झालेल्या या नोटीसांमध्ये संबंधित मालमत्ताधारकांना चार आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. यामध्ये त्यांनी आपल्या मालमत्तेबाबतचे स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. जर त्यांनी दिलेल्या मुदतीत उत्तर दिले नाही, तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे नोटीसीत स्पष्टपणे नमूद आहे.
या कारवाईमुळे व्यापारी वर्गात प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. बहुतांश व्यापारी आपल्या मालमत्तांवर अनेक वर्षांपासून व्यापार करत आहेत आणि त्यांना या नोटीसीमुळे त्यांच्या मालमत्तांच्या भवितव्याबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे. व्यापारी संघटनांच्या मते, या मालमत्तांचे व्यवहार कायदेशीर आहेत आणि कोणत्याही प्रकारे बेकायदेशीर ताबा घेण्यात आला नाही, असा त्यांचा दावा आहे.
या नोटीसीमुळे मालमत्ताधारकांच्या चिंतेत भर पडली आहे. काही व्यापाऱ्यांनी या नोटीसीबाबत अधिक स्पष्टता मागितली आहे, तर काहींनी वक्फ बोर्डाकडून या प्रकरणात अधिक सुस्पष्ट माहिती देण्याची मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.