photo 
मराठवाडा

आता... छेडछाड कराल तर बसणार ‘शॉक’

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : येथे सुरू असलेल्या जिल्‍हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कन्नड (जि. औरंगाबाद) येथील आजूबाई विद्यालयातील पूजा चव्हाण या बाल वैज्ञानिकाने तरुणींची छेडछाड कोणी करीत असेल तर स्वसंरक्षणासाठी यंत्र तयार केले आहे. छेडछाड केल्यास विजेचा धक्का बसणारे यंत्र तयार केले आहे.

येथील साई रिसॉर्ट येथे इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले आहे. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या प्रदर्शनाचा समारोप बुधवारी (ता. पाच) झाला. या प्रदर्शनात हिंगोलीसह औरंगाबाद, बीड, परभणी आदी जिल्ह्यांतील बाल वैज्ञानिक सहभागी झाले होते. यामध्ये बालवैज्ञानिकांनी विविध प्रयोग सादर केले. यामधील कन्नड येथील बालवैज्ञानिकांनी सादर केलेला स्वसंरक्षण यंत्राचा प्रयोग लक्ष वेधून घेत होता. शाळा, महाविद्यालये परिसर किंवा प्रवास करीत असताना विद्यार्थिनी, युवती एकट्या जात असताना छेडछाडीच्या घटना घडण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच बँकेतून पैसे काढल्यानंतर किंवा भरण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तींकडून पैसे हिसकावण्याचे प्रकार घडत आहेत. 

टाकाऊ वस्तूंपासून स्वसंरक्षण यंत्र

या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस विभाग संतर्क असतो. मात्र, तरीही अशा घटना घडत आहेत.या सर्व प्रकारावर मात करण्यासाठी तसेच महिलांची, युवतींची अशा घटनांपासून सुटका करण्यासाठी कन्नड येथील आजूबाई विद्यालयातील पूजा चव्हाण हिने संशोधन केले आहे. टाकाऊ वस्तूंपासून स्वसंरक्षण यंत्र विकसित केले आहे. छेडछाड करणाऱ्यांना या यंत्रामुळे विजेचा धक्का लागणार आहे. या यंत्रामध्ये हॅंडग्लोजला सर्किट वायर जोडले आहेत. त्या सर्किटमधून डास मारणाऱ्या ब्यॅटला हेड फोनचे वायर जोडले आहेत. 
 

ब्यॅटवरील बटन पुश केल्यास विजेचा धक्का

स्वसंरक्षणासाठी ही यंत्रणा सज्ज ठेवावी लागणार आहे. बाहेर पडल्यास जर एखादा युवकाने छेडण्याचा प्रयत्न केल्यास तातडीने ब्यॅटवरील बटन पुश केल्यास समोरच्याला जोराचा विजेचा धक्का लागतो. त्यामुळे तो पुन्हा हात लावण्याचा प्रयत्न करणार नाही. त्याच वेळात तातडीने आपण कोणाची तरी मदत घेऊन सुटका करू शकतो. यावर अधिक संशोधन झाल्यास नक्कीच या उपकरणाचा फायदा जास्त करून महिलांना होणार असल्याचे बालसंशोधक पूजा चव्हाण हिने सांगितले.

पिठाची गिरणी ठरणार आरोग्यदायी

हिंगोली: येथे सुरू असलेल्या इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनीत खडकेश्वर (जि. औरंगाबाद) येथील बालज्ञा मंदिर माध्यमिक विद्यालयाची प्रिया दाभाडे हिने शारीरिक व्यायामाच्या आधारावर पिठाची गिरणी बनविली आहे. हा प्रयोग पाहण्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांनी गर्दी केली होती.
शिक्षक यू. एस. शेजूळ, के. एन. कौडवार यांच्या मार्गदर्शनाखाली तिने हा प्रयोग सादर केला.पूर्वी बहुतांश घरी महिला जात्यावर दळण दळत असत. त्यामुळे महिलांचे आरोग्य चांगले असे. आता विजेवर चालणारी पिठाची गिरणी अस्तित्वात आल्या आहेत. 

व्यायाम होऊन पीठही तयार होणार

दरम्यान, विजेची बचत व्हावी व शरीराला व्यायाम व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आरोग्यवर्धक पिठाची गिरणी तिने तयार केली आहे. आरोग्य वर्धक गिरणी पायाने चालविले जाते. यामुळे व्यायाम होऊन पीठही तयार होते. या पिठाच्या गिरणीमध्ये अधिक संशोधन झाल्यास प्रत्येक घरोघरी आरोग्यवर्धक पिठाची गिरणी राहील. दरम्‍यान, पंधरा शाळेतील तीन हजारांच्या जवळपास विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनाला भेट दिली आहे.

विभागीय पातळीवर तेरा प्रयोगांची निवड

येथील इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनाचा समारोप बुधवारी (ता. पाच) झाला. यात एकूण १४२ प्रयोग सादर करण्यात आले. यातील तेरा प्रयोगांची विभागीय पातळीवर निवड झाली आहे.
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यस्‍थानी शिक्षणाधिकारी पी. बी. पावसे; तर विशेष अतिथी म्हणून सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी शिवाजीराव पवार, डॉ. विठ्ठलराव करंडे, रामचंद्र मोरे यांची उपस्‍थिती होती. परीक्षक म्हणून विशाल वाघमारे, डॉ. एन. एस. बजाज, डॉ. वाय. एस. नलवार, डॉ. बी. एस. साळवे, डॉ. सत्यजित चव्हाण यांनी काम पाहिले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Jihad: भाजपच्या ‘वोट जिहाद’ प्रचाराला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजपला पुण्यात विशिष्ट समाज...

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SCROLL FOR NEXT