Now Jungle Safari at Panganga Sanctuary  sakal
मराठवाडा

आता पैनगंगा अभयारण्यात करा 'जंगलसफारी'

खरबी सफारी गेट आजपासून पर्यटकांसाठी खुला होणार

सकाळ वृत्तसेवा

किनवट : निसर्ग तथा वन्यजीवप्रेमींच्या मागणीवरून पैनगंगा (वन्यजीव) अभयारण्य क्षेत्रातील खरबी वनपरिक्षेत्रात खरबी सफारी गेट येथून शनिवारपासून निसर्ग पर्यटन सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती सहायक वनसंरक्षक (वन्यजीव) रवींद्र कोंडावार यांनी दिली. या जंगलसफारी उपक्रमामुळे अभयारण्यातील पर्यटनाला चालना मिळेल.

पैनगंगा अभयारण्य हे यवतमाळ जिल्हा आणि नांदेड जिल्हा या दोन विभागांना विभागणाऱ्या पैनगंगा नदीच्या दोन्ही बाजूस असलेला संरक्षित वनास दिलेले नाव आहे. तीन बाजूंनी पाणी असलेले हे महाराष्ट्रातील एकमेव अभयारण्य आहे. वन्यप्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी पैनगंगा अभयारण्याची स्थापना ही १ जानेवारी १९१६ ला झाली. या अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ३२५ चौरस किलोमीटर आहे. जलाशयाने परिपूर्ण असलेल्या पैनगंगा नदीच्या तीरावर घनदाट पैनगंगा अभयारण्य आहे. या नदीमुळे यवतमाळ जिल्ह्याला अलौकिक वनसंपदा लाभलेली असून, या अभयारण्यात औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींच्या सुमारे २०० जाती आहेत.

घनदाट जंगल आणि आजूबाजूला असलेल्या जलाशयामुळे या अभयारण्यात प्राणीजीवन सर्वाधिक आहे. पैनगंगा अभयारण्याच्या खरबी वनपरिक्षेत्रात कुसळी, खस, तिरकडी, पवण्या, मारवेल यांसारख्या गवताच्या जाती उगवत असल्याने येथे वाघ, बिबट्या, अस्वल, लांडगा, रानकुत्रे, तरस, चितळ, सांबर, चौसिंगा, खवले मांजर, मसण्या ऊद, भेकर, काळवीट इत्यादी सोबतच विविध पशुपक्ष्यांचा मोठ्याप्रमाणात वावर आहे. पर्यटकांसाठी हे अभयारण्य खुले करावे, अशी वन्यप्रेमींची मागणी होती. या मागणीनुसार क्षेत्रसंचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती येथील ज्योती बॅनर्जी, विभागीय वनअधिकारी (वन्यजीव) पांढरकवडा येथील किरण जगताप आणि सहायक वनसंरक्षक पैनगंगा अभयारण्य उमरखेड येथील रवींद्र कोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली खरबी सफारी गेट पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे.

अशी करता येणार बुकिंग

या निसर्ग पर्यटनाचे बुकिंग क्षेत्रसंचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती यांच्या नियंत्रणाखाली ऑनलाइन पद्धतीने www.magicalmelghat.in या संकेतस्थळावर सुरू करण्यात आले आहे. सदर प्रवेशद्वारावरून रोज सकाळी ५ :३० ते ९:३० या कालावधीत सात वाहने व दुपारी ३:०० ते ६:३० या कालावधीत सात वाहने रोज जंगल सफारी करिता सोडण्यात येणार आहेत. तसेच गर्दीच्या एप्रिल, मे व जून या कालावधीत दोन ऑफलाइन वाहने अशी एकूण सोळा वाहने सोडण्यात येतील. पैनगंगा (वन्यजीव) अभयारण्य मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर असून, लागूनच तेलंगणा या राज्याची सीमा असल्यामुळे सदर प्रवेशद्वार किनवट, नांदेड, यवतमाळ, औरंगाबाद, नागपूर, आदिलाबाद व हैद्राबाद येथील वनप्रेमी पर्यटकांसाठी पर्वणीचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: कोपरी पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT