Laxman Hake sakal
मराठवाडा

OBC Reservation : चर्चेसाठी शिष्टमंडळ मुंबईत जाणार नाही - लक्ष्मण हाके

सकाळ वृत्तसेवा

अंकुशनगर (ता. अंबड) - ‘सगेसोयरे’बाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास केवळ ओबीसी नाही तर अनुसूचित जाती व जमातींच्या आरक्षणालाही धोका आहे. मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने ओबीसी संपविण्याचा शासनकर्त्यांचा घाट आहे, असा आरोप ओबीसी आरक्षण कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांनी मंगळवारी केला. सरकारसोबत चर्चेसाठी आपले कोणतेही शिष्टमंडळ मुंबईला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘ओबीसी आरक्षण बचाव’साठी हाके व त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांचे वडीगोद्री (ता. अंबड) येथे उपोषण सुरू आहे. उपोषणाचा आजचा सहावा दिवस होता. ‘मंत्रिमंडळ बैठकीत आमच्या मागण्यांवर चर्चा होईल, असे शिष्टमंडळाने सांगितले होते. आपण बारा कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करत आहोत, या भावनेने मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांनी वागावे,’ असे मत हाके यांनी व्यक्त केले.

शरद पवार हे देश पातळीवरचे मोठे नेते आहेत. मी ज्या गावात आंदोलन करतो आहे, त्या भागातील त्यांच्या लोकप्रतिनिधींनी एक तरी फोन करायला हवा होता, अशी खंत हाके यांनी बोलून दाखवली. यावेळी त्यांचा रोख आमदार राजेश टोपे यांच्याकडे होता.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी आंदोलनस्थळी त्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

आम्ही २७ टक्के आरक्षणात येतो. ओबीसी आरक्षण टिकले पाहिजे, यावर आमच्यासह धनगर समाजाचे एकमत आहे. मराठा समाज आरक्षणासाठीचे उपोषणकर्ते मनोज जरांगे हे मंत्री छगन भुजबळ यांना लक्ष्य करून धनगर समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांची ही‘फोडा आणि झोडा’ निती आहे.

- लक्ष्मण हाके, उपोषणकर्ते

महामार्ग रोखला

अंकुशनगर (जि. जालना) - ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांची प्रकृती खालावलेली असताना शासनाकडून कोणताही प्रतिनिधी आला नसल्याचा संताप व्यक्त करत नागरिकांनी धुळे-सोलापूर महामार्गावर वडीगोद्री येथे ‘रास्ता रोको’ केला. यामुळे जवळपास अर्धा तास वाहतूक कोंडी झाली होती. पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

मुख्यमंत्री आमच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत नागरिक रस्त्यावर उतरले होते. यावेळी संतप्त नागरिकांनी रस्त्यावर टायर जाळून सरकारचा निषेध केला. यावेळी आंदोलक नागरिक आणि पोलिसांत बाचाबाची झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai University Senate Election 2024 Result: सिनेट निवडणुकीत युवासेनेचा सर्व 10 जागांवर दणदणीत विजय

Latest Maharashtra News Updates : करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन आज बंद राहणार, काय आहे कारण?

Sakal Editorial Article : अग्रलेख - विकृतीला पायबंद

Sakal Editorial Article : भाष्य - अमेरिकी निर्बंधांचे 'औषध'

Sakal Editorial Article : हौस ऑफ बांबू - 'पुरुषोत्तम' साठीचा झाला नव्हं..!

SCROLL FOR NEXT