OBC Reservation Strike Sakal
मराठवाडा

OBC Reservation : ओबीसी समाजाचे आजपासून वडीगोद्री येथे साखळी उपोषण

दिलीप दखने

वडीगोद्री - ओबीसी समाज आरक्षण बचाव संघटनेच्या माध्यमातून अंतरवाली सराटी फाटा वडीगोद्री (ता. अंबड) येथे मंगळवार ता. 5 ते शनिवार ता. 23 डिसेंबर पर्यत साखळी उपोषण करण्यात येत आहे. या बाबतचे निवेदन मोटरसायकलची फेरी काढत सोमवार ता. 4 रोजी तहसील कार्यालय अंबड येथे नायब तहसीलदार धनश्री भालचिम यांना देण्यात आले.

या ठिकाणी भागातील वीस गावातील ओबीसी बांधव या साखळी उपोषण मध्ये सहभागी होत आहे. दररोज एक गाव यात सहभागी होणार आहे. मंगळवार ता. 5 रोजी वडीगोद्री या गावाचा जागर होत आहे.

न्यायमूर्ती शिंदे समिती तत्काळ रद्द करावी, वाटप करण्यात आलेले कुणबी जातीचे प्रमाणपत्र तत्काळ रद्द करावे, जात निहाय जनगणना करण्यात यावी, ओबीसी कोट्यातुन मराठा समाजास आरक्षण देऊ नये. आदी प्रमुख मागणीसाठी हे साखळी उपोषण करण्यात येत आहे. शासनाने या मागणी बाबत विचार न केल्यास 24 डिसेंबर पासून आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे संयोजक समितीने सांगीतले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. तर मराठा समाजाला कुणबी मधुन ओबीसीमध्ये आरक्षण देण्यात येऊ नये, वाटप केलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे आदी मागणी करीता अंतरवाली सराटी फाटा वडीगोद्री येथे ओबीसी समाजाचे साखळी उपोषण होत आहे. यामुळे शासन या दोन्ही आंदोलन कसे हातळणार याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT