Pankaja Munde esakal
मराठवाडा

Pankaja Munde : Instagram वर पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह कमेंट; ओबीसी समाज आक्रमक, जिंतूरमध्ये तणावाचं वातावरण

एकाने इंस्टाग्रामवर बीडच्या सिंहासनावर बसणार कोण? अशी पोस्ट टाकली होती.

सकाळ डिजिटल टीम

इंस्टाग्रामवर माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याची माहिती मिळताच आज ओबीसी समाजाने जिंतूर बंदची हाक दिली. त्यास व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत शंभर टक्के बंद पळाला.

-विनोद पाचपील्ले

जिंतूर : मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) राज्यात सर्वत्र ओबीसी विरुद्ध मराठा (OBC vs Maratha) असे चित्र निर्माण झालेले असतांना तालुक्यातील पाचेगाव येथील एका अल्पवयीन तरुणाने त्याच्या इंस्टाग्राम वरून माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याने आ. मेघना बोर्डीकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी शनिवार (ता. २३) रात्री तीन वाजेपर्यंत पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत आरोपीच्या अटकेची मागणी केली. या घटनेच्या निषेधार्थ आज सोमवारी (ता.२४) जिंतूर बंदची (Jintur Bandh) हाक देण्यात आली होती. या बंदला व्यापाऱ्यांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला.

या बाबत अधिक माहिती अशी की, बीडमध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे ह्या लोकसभेच्या उमेदवार होत्या. त्या वेळी एकाने इंस्टाग्रामवर बीडच्या सिंहासनावर बसणार कोण? अशी पोस्ट टाकली होती. या पोस्टच्या खाली तालुक्यातील पाचेगाव येथील मराठा समाजाच्या एका तरुणाने त्याच्या इंस्टाग्राम वरून माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याबद्दल अपशब्द वापरत कमेंट केली. ही कमेंट वाचताच ओबीसी समाजात तीव्र असंतोष पसरला.

रात्री १० च्या सुमारास सर्व पक्षीय ओबीसी समाजाच्या लोकांनी संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्याच्या मागणीसाठी पोलीस स्थानक गाठले. या घटनेची माहिती आ. मेघना बोर्डीकर यांना मिळाली. त्यांनी पोलीस स्थानक गाठले. पोलिसांनी अविनाश काळे यांच्या फिर्यादीवरून संबंधित तरुणाविरुद्ध जिंतूर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर बोर्डीकर यांच्यासह उपस्थित ओबीसी समाजाने आरोपीस तात्काळ अटक करण्याची मागणी लावून धरली. जोपर्यंत आरोपीस अटक करणार नाही, तोपर्यंत पोलीस स्थानकामधून उठणार नसल्याचे सांगितले.

यावेळी बोरी, बामणी, चारठाणा, परभणी येथून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास संबंधितास ताब्यात घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर आमदार मेघना बोर्डीकर व सर्व ओबीसी कार्यकर्त्यांनी पोलीस स्थानक सोडले. संबंधित आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू मुत्यपोड, फौजदार गोपीनाथ वाघमारे, अजित बिराजदार, सिद्धेश्वर चाटे, नामदेव डुबे, राम पौळ, बीट जमादार गुंगाने, शिराळकर यांनी ताब्यात घेतले.

जिंतूर बंद यशस्वी

इंस्टाग्रामवर माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याची माहिती मिळताच आज ओबीसी समाजाने जिंतूर बंदची हाक दिली. त्यास व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत शंभर टक्के बंद पळाला. या वेळी शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या मोर्च्यामध्ये ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने सामील झाले. हा मोर्चा तहसीलमध्ये गेल्यानंतर तहसीलदारांना निवेदन देऊन कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली.

अशा गोष्टींना समर्थन नाही : माजी आ. भांबळे

समाज माध्यमावर काही व्यक्तींनी अश्लील भाषेत मजकूर लिहून सामाजिक भावना दुखावल्या आहेत. मला सर्व समाज व महिलांविषयी आदर असून राजकीय जीवनात माझ्यासोबत अनेक व्यक्ती फोटो काढतात. सदर कृत्य करणाऱ्या व्यक्तीसोबत माझा फोटो प्रोफाईलवर असल्याचा काही राजकीय व्यक्ती गैरफायदा घेऊ इच्छित असून त्यास वेगळे वळण देत आहे. मी सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या विकृत लिखाणाचा व मानसिकतेचा तीव्र निषेध करतो. प्रत्येक नागरिकाने दुसऱ्या समाजाविषयी व महिलांविषयी आदराची भावना ठेवावी, असे आवाहन त्यांनी प्रसिद्धी पत्रकात केले.

पत्र देऊन सारवा सारव करण्याचा प्रयत्न - आमदार बोर्डीकर

समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कुठल्याही समाजाला पटणारा नसून कार्यकर्त्यांना बळ देऊन त्यांना महिला आमदार व महिलांविषयी समाज माध्यमावर अश्लील भाषेत लिहायला कोण प्रोत्साहन देतो? हे सर्वांना माहीत आहे. तुळजाभवानी साखर कारखाना बंद पडल्या बद्दलच्या अफवा कार्यकर्त्यांना फेसबुकवर कोणी पसरविण्यास लावल्या? हे ही जनतेला माहीत आहे. असे बोलून पंकजा मुंडे यांच्या बद्दल विकृत लिखाण करणाऱ्या तरुणाची आठ दिवसांपूर्वी भेट घेऊन त्यास माजी आमदारांनी प्रोत्साहित केल्याचा आरोप ही बोर्डीकर यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT