Latur Loksabha Election Result  sakal
मराठवाडा

Latur Loksabha Election Result : प्रभावी प्रचार काँग्रेसच्या कामी

एकेकाळी बालेकिल्ला राहिलेल्या लोकसभेच्या लातूर मतदारसंघात पुन्हा एकदा काँग्रेसने वर्चस्व मिळविले आहे. गेल्या दोन निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघावर झेंडा फडकावला होता.

हरी तुगावकर : सकाळ वृत्तसेवा

एकेकाळी बालेकिल्ला राहिलेल्या लोकसभेच्या लातूर मतदारसंघात पुन्हा एकदा काँग्रेसने वर्चस्व मिळविले आहे. गेल्या दोन निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघावर झेंडा फडकावला होता. या निवडणुकीत या पक्षाला गटबाजीचे ग्रहण भोवले आहे. दुसरीकडे डॉ. शिवाजी काळगे यांना विजयाचा गुलाल लावत काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी लातूर हा काँग्रेसचाच बालेकिल्ला आहे, हे दाखवून दिले आहे. काँग्रेसने देशमुख आणि भाजपने माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली होती. यात पाटलांपेक्षा देशमुखच सरस ठरले. जिल्ह्यातील मतदारांनीही त्यांच्यावर विश्वास दाखविला आहे.

काँग्रेसचा बालेकिल्ला असताना २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत मोदी लाटेत भाजपचे कमळ फुलले होते. या निवडणुकीत भाजपने विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखविला होता. शृंगारे यांनी पक्षश्रेष्ठींकडून उमेदवारी आणली होती. पक्षाच्या पहिल्याच यादीत त्यांची उमेदवारी जाहीर झाली होती. स्थानिक नेत्यांना हे पटले नव्हते. त्यात जिल्ह्यात पक्षातील गटबाजी वारंवार समोर आली आहे. या निवडणुकीतही हे प्रकर्षाने दिसून आले. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बैठक घेऊन आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या खांद्यावर निवडणुकीची जबाबदारी टाकली होती. सोबत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना होती.

विद्यमान खासदार गेली चार वर्षे मतदारसंघात फारसे फिरकले नाहीत. गेल्या एक वर्षात ते जनतेत जाताना दिसून आले. त्यामुळे मतदारांत त्यांच्याबद्दल नाराजी राहिली. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक सभा घेऊन विजयाची हॅटट्रिक साधू, असा अतिआत्मविश्वास पक्षाच्या नेत्यांना होता. त्यामुळे जिल्ह्यातील नेत्यांनी ही निवडणूक एकत्रित लढली, असे चित्र फारसे दिसले नाही. प्रभावी प्रचार यंत्रणा राबविण्यातही पक्ष कमी पडला. ऐन निवडणुकीत काँग्रेसचे नेते माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सूनबाई डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांना पक्षात घेऊन भाजपतर्फे लिंगायत समाजाला आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न झाला, पण तो यशस्वी ठरला नाही.

याचा एकत्रित परिणाम शृंगारे यांच्या पराभवात झाला आहे. या निवडणुकीत उमेदवार कोण द्यायचा, असा प्रश्न सुरवातीला काँग्रेससमोर होता. आमदार अमित देशमुख यांनी वेगवेगळ्या घटकांशी चर्चा करून डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिली. २०१४ च्या निवडणुकीत डॉ. काळगे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली होती, पण त्यांना नाकारण्यात आली. त्यानंतर त्यांनी २०१९ मध्ये भाजपकडून उमेदवारी मागितली होती.

पण, उपयोग झाला नाही. यावेळी मात्र त्यांना संधी मिळाली. काळगेंसाठी देशमुखांनी प्रचंड मेहनत घेतली. सर्व देशमुख कुटुंब प्रचारात उतरले. संविधान बचाव, महागाई, शेतकरी, बेरोजगारी असे प्रश्न ऐरणीवर आणले. लोकांनीच ही निवडणूक हाती घ्यावी, यात ते यशस्वी झाले. मराठा आरक्षणाचा विषय, मोदी फॅक्टरचा कमी झालेला प्रभाव, मुस्लिम समाजाचे उत्स्फूर्तपणे मतदान, लिंगायत समाजाला वळविण्यात आलेले यश, जिल्ह्यातील डॉक्टर्सनी हाती घेतलेली निवडणूक, दलित समाजाकडून मिळालेली सहानुभूती आदींचा एकत्रित परिणाम काँग्रेसच्या विजयात झाल्याचे दिसून येते.

‘वंचित’चे मतदानही काँग्रेसच्या पाठीशी

गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राम गारकर यांनी एक लाख बारा हजार मते मिळवली होती. या निवडणुकीत ‘वंचित’ला मतदारांनी फारसे विचारात घेतले नाही. पक्षाचे उमेदवार नरसिंगराव उदगीरकर यांना केवळ ४२ हजार २२५ मतेच मिळाली. ‘वंचित’चे मतदार वळविण्यात काँग्रेसला यश आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT