संग्रहित चित्र. 
मराठवाडा

जालन्याला यायचंय, 'या' लिंकवर करा अर्ज 

महेश गायकवाड

जालना - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यात अनेक विद्यार्थी, मजूर कुटुंबे आणि यात्रेकरू अडकले आहे. केंद्र व राज्य शासनाने त्यांना घरी परतण्यासाठी परवानगी दिली. शासनाने दिलेल्या दिशानिर्देशानूसार जिल्ह्यात अडकलेल्या मजूर, विद्यार्थी व यात्रेकरूंना आपल्या घरी जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी प्रशासनाने ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

जिल्हाबाहेरील व्यक्तीबरोबर जिल्ह्यातील जे व्यक्ती परराज्यात तसेच राज्यातील विविध जिल्ह्यात अडकले आहेत. त्यांनाही जिल्ह्यात परत येण्यासाठी आपली माहिती जिल्हा प्रशासनाकडे भरण्यासाठी ऑनलाईन लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

जालना जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात तसेच राज्याबाहेर जाण्यासाठी नागरिकांना https://bit.ly/2StWL66 या लिंकवर अर्ज करावा लागणार आहे. तर परराज्यातून किंवा राज्यातील इतर जिल्ह्यातून जालना जिल्ह्यात येऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना https://bit.ly/2z28UIu या लिंकवर जाऊन आपली माहिती भरावी लागणार आहे. 

पोलिसांचीही परवानगी लागणार 

जालना जिल्ह्यातून इतर राज्यांत, जिल्ह्यांत जाण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत https://jalna.gov.in/tofromjalna/ संकेतस्थळावर लिंक देण्यात आलेल्या आहेत. तसेच पोलिस विभागाचा प्रवासासाठी परवाना मिळण्यासाठी http://covid१९.mhpolice.in ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये माहिती भरावी. परराज्यांत व परजिल्ह्यांत जाण्यासाठी दोन्ही प्रकारच्या परवानग्या आवश्यक आहेत. या परवानग्या केवळ ऑनलाइन पद्धतीने दिल्या जाणार असल्याने कोणीही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू नयेत. तसेच जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नोंदणी करू नये. नोंदणी केल्याचे आढळल्यास संबंधितावर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे. 

चोवीस कर्मचाऱ्यांची नेमणूक 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मध्ये जालना जिल्ह्यात अडकून पडलेले मजूर,कामगार,विद्यार्थी, आणि यात्रेकरूंना त्यांच्या राज्यात अथवा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात जाऊ देण्यासंदर्भात केंद्र आणि राज्य शासनाने नुकतेच आदेश निर्गमित करून मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती पाऊलं उचलली आहेत. बाहेर जिल्हा आणि राज्यात जाऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींच्या अर्जाच्या छाननी बरोबरच संबधित व्यक्तींना पासेस तयार करून देण्यासाठी जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांच्या आदेशानुसार निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी चोवीस कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT