online fraud cyber crime police action get money back dharashiv marathi news Sakal
मराठवाडा

Online Fraud : "गेलेला पैसा परत मिळतो; पण…." अशी फाईल करा ऑनलाइन तक्रार

सकाळ वृत्तसेवा

धाराशिव : मोबाइलनं घात केलाय काहीतरी करा साहेब, कष्टाचा पैसा हातून गेलाय, हतबलतेचे हे शब्द पोलिस ठाण्याला नवे नाहीत. पण गेलेला पैसा परत मिळतच नाही. मात्र धाराशिव पोलिसांमधील एका हवालदारानं ऑनलाइन फसवणुकीत गमावलेली पाच लाख रुपयांची रक्कम एका सामान्य नागरिकाला परत मिळवून दिलीय.

सध्या ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. पोलिसांत तक्रार करूनही पैसे परत मिळत नाहीत. पण या समजाला छेद देत हेड कॉन्स्टेबल गणेश जाधव यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिस दलाची मान उंचावली आहे. झाले असे की मार्च महिन्यात एक दिवशी सकाळीच एक व्यक्ती धावत पोलिस ठाण्यात आली.

सहा लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची तक्रार केली. जाधव यांनी तत्काळ त्यावर काम सुरू केले. श्री.जाधव म्हणतात की, फिर्यादीच्या मोबाईलमध्ये पाहिल्यानंतर सहावेळा लिंकवर गेल्याने व्यवहार झाल्याचे दिसले. आरोपीने आर्मीत असल्याचे भासवले. मोबाईलवर बोलत असतानाच क्रेडीट कार्डची लिंक देऊन फिर्यादीचा आयडी व पिन मागवून घेतला. सहावेळा त्यांच्या खात्यातून सहा लाख ९८ हजार रुपये गेल्याचे लक्षात आले.

कसे मिळाले पैसे

जाधव यांनी पहिल्यांदा क्रेडीट कार्डचे व्यवहार कशावर झालेत याची माहिती घेतली. व्यवहार पेटीएमकडे झाले होते. त्यांच्याकडून व्यवहाराची पत्रव्यवहार व मेलद्वारे माहिती मागविली. पेटीएमकडून तत्काळ उत्तर आले. त्यांनी इंड्सलँड बँकेकडे पैसे गेल्याचे सांगितले.

बँकेकडे पत्रव्यवहार केला, तेव्हा पैसा इन्स्टा मुद्राकडे असल्याचे त्यांना इन्स्टाकडूनही माहिती मिळाली तेव्हा पाच लाख १८ हजार रुपयाची रक्कम होल्ड केल्याचे कळले. उर्वरित रक्कम क्रेडीट कार्डद्वारे काढली होती. रक्कम तशीच होल्ड करून ठेवण्याच्या सूचना इन्स्टा मुद्राला दिल्या. रक्कम न्यायालयाच्या माध्यमातून फिर्यादींना देण्यात आल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले.

फिर्यादींनी नाव जाहीर करू नये अशी विनंती केल्याने नाव गोपनीय ठेवण्यात आले. या प्रकरणी फिर्यादी तातडीने आले व त्यानंतर प्रक्रिया गतीने झाल्याने रक्कम मिळविण्यात यश आल्याचे जाधव सांगतात. सहसा अशा प्रकरणात लवकर माहिती होत नाही. जेव्हा माहिती होते, तेव्हा खूप उशीर झालेला असतो. तोपर्यंत आरोपीने त्याचे काम पूर्ण केलेले असते. अशी घटना घडल्यानंतर कसलाही वेळ न लावता सायबर विभागाशी संपर्क साधणे आवश्यक आहे तरच त्याचा छडा लागू शकतो, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

अशी फाईल करा ऑनलाइन तक्रार

यासाठी तुम्ही https://www.cybercrime.gov.in या वेबसाइटवर जा. येथे तुम्हांला अनेक ऑप्शन्स मिळतील. येथे तुम्हाला Report Cyber Crime सेक्शनवर क्लिक करा. येथे तुम्हाला File a Complaint या ऑप्शनवर क्लिक करा. येथे एक मॅसेज वाचून तुम्हाला I Accept चेक बॉक्सवर क्लिक करा. येथे तुमच्यापुढे नवी विंडो ओपन होईल. येथे तुम्हाला ऑनलाइन डिटेल्स भरायची आहे. येथे तुम्हाला न्यू यूजर ऑप्शनवर जाऊन रजिस्टर करावं लागेल.

काय करू नका

  • फसव्या कॉलला बळी पडून देऊ नका एटीएम कार्ड नंबर.

  • आपला एटीएम पासवर्ड कुणासोबतही शेअर करू नये

  • एटीएम कार्डचा एक्सपायरी डेट, महिना, वर्ष सांगू नये

  • मॅसेजमध्ये येणारा ओटीपी पीन क्रमांक अनोळखी व्यक्तीला देऊ नये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT