परभणी : ‘ओएलक्स’ या ऑनलाइन कंपनीवरील मोटारसायकल घेण्यासाठी ६० हजार रुपये भरूनदेखील मोटारसायकल मिळाली नसल्याने फसवणूक झालेल्या एका ग्राहकाची फसवणूक झाल्याप्रकरणी नवामोंढा पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. १६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘ओएलेक्स’ या ऑनलाइन कंपनीवर मोटरसायकल विक्रीची जाहिरात पाहून परभणी शहरातील धन्वंतरी कॉलनीतील रहिवाशी अनिरुद्ध पवार यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क केला. संपर्क झाल्यानंतर समोरील व्यक्तीने ऑनलाइन पैसे पाठवा, असे सांगितले. त्यानुसार अनिरुद्ध पवार यांनी ६० हजार १०० रुपये ‘फोन पे’ या अॅपवरून पाठविले. त्याचबरोबर ओळख पटावी म्हणून आधार कार्ड, मिलिट्रीत असल्याचे सांगितल्याने आपण समोरील व्यक्तीवर विश्वास ठेवून ता. चार व पाच डिसेंबर रोजी सांगितलेल्या ‘फोन पे’ वर वेगवेगळ्या तीन वेळा एकूण ६० हजार १०० रुपये पाठविले. मात्र, आपल्याला मोटरसायकल मिळाली नाही. शिवाय, दिलेला मोबाईलनंबरच बंद असल्याचे लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे मोंढा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक रामेश्वर तट हे करीत आहेत.
डोळ्यात मिरची पूड टाकून लुटण्याचा प्रयत्न
गंगाखेड : बँकेत पैशाचा भरणा करण्यासाठी निघालेल्या दोघा दुचाकीस्वारांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्याजवळील रोख रक्कम लांबविण्याचा प्रयत्न परळी रस्त्यावरील मार्केट यार्डच्या कमानीजवळ सोमवारी (ता.१६) सकाळी ११ च्या सुमारास पेट्रोटलपंपाजवळ घडला. दरम्यान, पैशाची बॅग घट्ट धरून ठेवल्याने व आरडाओरडा केल्याने चोरट्यांना पैसे लांबविता आले नाहीत.
गंगाखेडपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या परळी रोडवर लखन गोंविदराव राठोड यांचा पेट्रोलपंप आहे. सोमवारी सकाळी साडेदहा ते ११ वाजण्याच्या सुमारास पेट्रोलपंपावरील दोघेजण दुचाकीवर पाच हजारांची रक्कम असलेली बॅग घेऊन आर्य वैश्य बॅंकेत पैसे भरण्यासाठी निघाले होते.
दरम्यान, स्विफ्ट कंपनीची विनानंबरची कार पेट्रोलपंपाजवळील रस्त्यावर आली. दुचाकीवर पैसे घेऊन जाणाऱ्या दुचाकीला धडक दिली. कारमधील दोघे खाली उतरले. त्यांनी दुचाकीवरील दोघांच्या दिशेने मिरची पूड फेकत त्यांच्या हातात असलेली पैशाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, बॅग व्यवस्थित धरलेली असल्याने ती हिसकावण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला. दरम्यान, हातातील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न होत असल्याने त्या दोघांनी आरडाओरडा सुरू केल्याने पंपावरील इतर व्यक्तींनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. लोकांची गर्दी होत असल्याचे पाहून चोरट्यांनी तेथून पोबारा केला. या प्रकरणी गोविंदराज पेट्रोलपंपाच्या व्यस्थापक आकाश रामराव शिंदे दिलेल्या तक्रारीवरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.