Operation Ganga  esakal
मराठवाडा

ना अन्न, ना पाणी ! ४० तासानंतर युक्रेनमधून वैष्णवी परतणार भारतात

पालकांनी सोडला सुटकेचा निःश्वास

पंजाब नवघरे

वसमत (जि.हिंगोली) : युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे रोमानिया सीमेवर अडकलेल्या विद्यार्थ्यांना ४० तास ताटकळत काढावे लागले. त्यात खाण्या-पिण्याची व्यवस्था नसल्याने उणे २ अंश सेल्सिअस तापमानात विद्यार्थ्यांना रहावे लागले. दरम्यान, भारतीय दुतावासाच्या मदतीने सदर विद्यार्थी रोमानिया विमानतळावरून सोमवारी रात्री दिल्लीकडे रवाना होणार आहेत. यामध्ये वसमतच्या वैष्णवी जाधवचाही समावेश आहे. वसमत(Vasmat) तालुक्यातील जुनूना येथील विद्यार्थिनी वैष्णवी विलास जाधव ही वैद्यकीय शिक्षणासाठी मागील तीन वर्षांपासून युक्रेनमध्ये आहे. रशियाने युक्रेनच्या (Ukraine) राजधानीवर बॉम्बहल्ला केला. त्यानंतर सुरू झालेल्या युद्धामुळे शेकडो विद्यार्थी युक्रेनमध्येच अडकले. (Operation Ganga Finally Vaishnavi Jadhav Will Return India From Ukraine)

त्यात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. वसमत तालुक्यातील वैष्णवी जाधव हिच्यासह इतर विद्यार्थ्यांना युक्रेनमधील भारतीय दुतावासांनी रोमानिया सीमेपर्यंत आणून सोडले. परंतु, रोमानियाच्या सैनिकांनी त्यांना सीमेकडे येण्यास मज्जाव केल्याने त्यांना तब्बल ४० तास सीमेपासून १ हजार फुट अंतरावर ताटकळत थांबावे लागले. त्यानंतर त्यांनी पालकांशी संपर्क साधून तेथील परिस्थिती सांगितली. दरम्यान, वैष्णवीचे काका अलोक जाधव आणि वडील विलास जाधव यांनी खासदार हेमंत पाटील (MP Hemant Patil) यांच्याशी संपर्क साधून सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर खासदार पाटील यांनी दिल्लीत तळ ठोकून असलेल्या खासदर संजय राऊत आणि हेमंत गोडसे यांच्याशी संपर्क साधून पुढील प्रक्रिया करून घेतली. रोमानिया येथील भारतीय दुतावासाच्या मदतीने सदर विद्यार्थ्यांना रोमानियातील विमानतळावर आणण्यात आले असून त्यांना सोमवारी रात्री विमानाने दिल्लीत पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

पालकांची प्रतीक्षा संपेना

जुनूना येथील वैष्णवी जाधव ही तीन वर्षांपासून युक्रेनमधील चेरनिवतंसयी शहरात ब्युकोविनियन या वैद्यकीय विद्यापीठात शिक्षण घेत आहे. तिने त्यांच्या घरच्यांना संपर्क साधून सर्व परिस्थिती सांगितली. तसेच सध्याला पिण्याचे पाणी, खाण्याचे साहित्य व लॅपटॉप एवढे साहित्य घेत, रुमानिया सीमेवर पोहोचल्याचे सांगितले. तब्बल ४० तासानंतर या विद्यार्थ्यांना सीमा ओलांडला असून त्यांचे इमिग्रेशन झाले असल्याचे वैष्णवीने तिच्या पालकांना सांगितले. तसेच नास्ता करून आम्ही सर्व विद्यार्थी विमानतळाकडे निघालो असून तेथून पुढे विमानाने दिल्लीला येऊ, असेही वैष्णवीने सांगितले.

खासदार हेमंत पाटील यांचे वैयक्तिक लक्ष...

खासदार हेमंत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विद्यार्थी सुखरूप असल्याचे सांगितले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी खासदार संजय राऊत आणि हेमंत गोडसे यांना दिल्लीत पाठविलेले आहे. आम्ही त्यांच्या माध्यमातून पुढे संपर्कात आहोत. वैष्णवीचे काका अलोक जाधव, श्रीनिवास भोसले हेही माझ्या संपर्कात असून वैष्णवी मंगळवारी दिल्लीत पोहोचेल, असा विश्वास खासदार पाटील यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT