येरमाळा (जि. उस्मानाबाद) : यंदा पावसाने वेळेत दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. कळंब तालुक्यातील येरमाळा परिसरात सोमवारी (ता. १५) दुपारी दोनच्या सुमारास दीड तास जोरदार पाऊस झाला.
या पावसामुळे तेरणा नदी दुथडी भरून वाहत असल्याने या नदीवरून अनेक गावाला जोडणाऱ्या रस्त्यांवरची वाहतूक पुलावर पाणी आल्याने सुमारे तासभर ठप्प झाली होती. येरमाळा-कळंब रस्त्यावरील तेरणा नदीच्या पात्रात पुलाचे काम सुरू असून, वाहतुकीसाठी केलेला पर्यायी रस्ता पाण्याखाली गेल्याने दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.
यंदा पावसाने दमदार सुरवात केल्याने पेरणीपूरक पाऊस झाल्याने शेतकरी पेरणीच्या लगबगीत आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने शेतकरी पेरणीच्या प्रतीक्षेत असताना व पेरणीसाठी वाफसा झाला नसताना सोमवारी दुपारी पुन्हा दीड तास मुसळधार पाऊस झाला.
शुक्रवारी (ता. १२) पाचच्या सुमारास तेरखेडा परिसरात सुमारे तासभर झालेल्या पावसाने उगम क्षेत्रातूनही तेरणा नदी दुथडी भरून वाहत होती. गेल्या सोळा वर्षांपासून मृग नक्षत्रात कधीच पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. मात्र यंदा मृग नक्षत्रात दमदार व मुसळधार पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांतही आनंदाचे वातावरण आहे.
या पावसामुळे तेरणा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे.
येरमाळा ते कळंब या रस्त्यावर तेरणा नदीच्या पात्रात पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता काढलेला होता. मात्र सोमवारी दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे तेरणा नदीला आलेल्या पाण्याखाली हा पर्यायी रस्ता गेला. परिणामी या रस्त्यावरील वाहतूक तासभर ठप्प झाली. त्यामुळे प्रवाशांना तासभर ताटकळत थांबण्याची वेळ आली होती. पाणी ओसरण्यास सुरवात झाल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
पावसाने तेरखेडा ते सटवाईवाडी, खामकरवाडी, रत्नापूर, सटवाईवाडी, येरमाळा, दहिफळ, हळदगाव तर येरमाळा, कळंब रस्त्यावर असलेल्या तेरणा नदीवरील पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी रस्ता पाण्याखाली गेल्याने सुमारे दोन तास वाहतूक बंद होती. पाणी कमी झाल्यानंतर हळूहळू वाहतूक सुरळीत झाली. अन्य लहान गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवरील पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद होती. नदीला आलेले पाणी पाहण्यासाठी प्रत्येक गावाच्या पुलावर लोकांनी गर्दी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.