Paithan,Historical Tourism  sakal
मराठवाडा

Paithan : प्रतिष्ठाननगरीची महतीच न्यारी

Historical Tourism : सातवाहनांची राजधानी असलेल्या पैठणमध्ये ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि आधुनिक पर्यटनाची संपदा आहे. येथे असंख्य प्राचीन स्थळे, तीर्थस्थळे आणि आधुनिक उद्यानांमुळे पर्यटकांची संख्या वाढत आहे.

सकाळ वृत्तसेवा

गजानन आवारे पाटील

ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक व आधुनिक पर्यटन केंद्र असलेल्या पैठणमध्ये पर्यटकांना आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता आहे. असे म्हणतात की, पैठणच्या प्रत्येक कोपऱ्यातच ‘इतिहासाच्या पाऊलखुणा’ दिसतात.

एकेकाळी सातवाहनांची राजधानी राहिलेल्या पैठणला यादव कालखंडात ‘दक्षिण काशी’चा बहुमान मिळाला. म्हणूनच प्रागैतिहासिक कालखंड ते यादवांच्या काळाचा अभ्यास करण्यासाठी इथे अभ्यासक आवर्जून येतात. 

चीन प्रतिष्ठाननगरी ही शालिवाहनांची राजधानी. सुमारे ३० राजांनी ४५० वर्षे पैठण या राजधानीच्या शहरातून राज्य केले. आजही २००० वर्षांपूर्वीच्या खुणा इथल्या पालथीनगरी या परिसरामध्ये सापडतात. ऐतिहासिक ८०० ते १००० वर्षे जुना तीर्थस्तंभ बघण्यासाठी इतिहासप्रेमी येतात. अद्वितीय शिल्पकलेचा नमुना असलेला हा तीर्थखांब अभ्यासकांच्या उत्सुकतेचा विषय आहे. 

सातवाहन काळातील अनेक वस्तू (कै.)बाळासाहेब पाटील वस्तुसंग्रहालयात जतन केलेल्या आहेत. यातील मातीच्या मूर्ती, जुने अडकित्ते, नाणी, तत्कालीन दिवे, वस्त्र, सातवाहनकालीन दागिने, हस्तीदंत, विविध शस्त्रे आदी विपुल संपदा बघायला मिळते. सातवाहनकालीन जकात व्यवस्थेचे दगडी रांजण, राजस्थानी शैलीतील कृष्णदयार्णव मठातील श्रीकृष्ण मूर्ती, सुबक कालभैरवाची मूर्ती, नृसिंह मूर्ती, शेषशयनी विष्णू मूर्ती, पेशवेकालीन गणपती, शनी गणपती मूर्ती बघण्यासाठी व दर्शनासाठी देशभरातून भाविक पैठणला आवर्जून येतात.

श्री संत एकनाथ महाराजांची कर्मभूमी व जन्मभूमी राहिलेल्या पैठणमध्ये नाथवाड्यातील विजयी पांडुरंग तसेच नाथ समाधी मंदिर या ठिकाणी एकादशी व षष्ठीनिमित्त लाखोंच्या संख्येने भाविक येतात. पैठणचे घाट पर्यटकांचे खास आकर्षण. कृष्णकमल तीर्थ, मोक्ष घाट, नागघाट, सिद्धेश्वर घाट, पिंपळेश्वर घाटांवर धार्मिक विधी व पवित्र स्नानासाठी भाविक येतात.  महानुभाव पंथाचे श्री चक्रधरस्वामी यांचेही पैठणमध्ये अधिक काळ वास्तव्य राहिल्याने श्री चक्रधर स्वामी मठामध्ये देशभरातून भाविक येतात.

वाळूपासून बनलेल्या देशातील एकमेव असलेल्या मुनिसुव्रतनाथ या जैनधर्मीयांच्या मंदिरात शनि अमावास्या व एरवीही लाखो भक्त येतात. आशिया खंडातील सर्वांत मोठे मातीचे धरण म्हणून प्रसिद्ध असलेले जायकवाडी धरण व नाथसागर जलाशय, देशविदेशातील हजारो पक्ष्यांचे वास्तव्य असलेले जायकवाडी पक्षी अभयारण्य आणि ३१० एकरांवर वृंदावन, शालीमार गार्डनच्या धर्तीवर असलेले श्री संत ज्ञानेश्वर उद्यान या आधुनिक पर्यटनस्थळांवर पर्यटक आवर्जून येतात. येथील पैठणी तर विश्वविख्यात झालेली आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळ होण्याची क्षमता असलेले पैठण सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान आहे. पैठणला पायाभूत सुविधांचा विकासास प्राधिकरणातील लेझर शो, गोदावरी नदीतील बोटीने वाहतूक व संत ज्ञानेश्वर उद्यानाचा विकास झाल्यास पैठण शहर हे पर्यटन नकाशावर नवीन झळाळी प्राप्त करेल.

- प्रा. संतोष गव्हाणे, इतिहास व पर्यटनप्रेमी

अजिंठा-वेरूळ या ठिकाणी येणारे देश-विदेशातील पर्यटक पैठणला भेट देतात. अशा पद्धतीने संत ज्ञानेश्वर उद्यानाचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे व लवकरच काम सुरू होईल.

- संदीपान पाटील भुमरे, खासदार

गोदावरी नदीकाठावरील जिजाऊ घाट पूर्ण झाल्यास तेथे जॉगिंग पार्क, ॲम्पी थिएटर आदींमुळे हा घाट पर्यटनाचे आकर्षण ठरेल.

- राजेंद्र बोरकर पाटील, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

इथल्या पुरातत्त्व वस्तुसंग्रहालयामध्ये दुसऱ्या शतकापासून ते एकोणिसाव्या शतकापर्यंतच्या वस्तू जतन करून ठेवण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांचे हस्तलिखित, सातवाहनकालीन नाणे, शृंगारपेटीसह विविध कालखंडातील दगडी मूर्ती शिल्प, काचेवरील चित्र, दुसऱ्या शतकातील शाडूच्या मातीची स्त्रीशिल्प, शस्त्रात्रे, वाघनखे, पानपुडे बघता येतात.

- सुनील गायकवाड (नाईक), बाळासाहेब पाटील शासकीय वस्तू पुरातत्त्व विभाग, पैठण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासणीसाठी कुणी पुढं आलं नाही, उद्धव ठाकरे म्हणाले- आज मला.....

Nashik Vidhan Sabha Election : कलम 370 वर काय, शेतकरी आत्महत्यांवर बोला; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे

Maharashtra Vidhan Sabha election 2024: पंधरा लाख मतदारांचं ऊसतोडणीसाठी स्थलांतर; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

Ajit Pawar : 'किंगमेकर' किंवा 'स्पॉयलर' होण्यात मला रस नाही, अजित पवार असं का म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची हुसेन दलवाईंवर टीका

SCROLL FOR NEXT