Akshay Purjalkar sakal
मराठवाडा

Akshay Purjalkar : वडिलांच्या कष्टाचे फेडले पांग! पाणीपुरी विक्रेत्याचा मुलगा झाला वैद्यकीय अधिकारी

सकाळ वृत्तसेवा

कळमनुरी - जेमतेम शिक्षण असलेल्या व पाणीपुरीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या शहरातील शिवलिंग पुरजळकर यांनी मुलाला डॉक्टर बनवण्याचे ध्येय बाळगले. मुलानेही तितक्याच जिद्दीने अभ्यासक्रम पूर्ण करीत आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारीपदी मजल मारली. अक्षयचे हे यश तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

शिवलिंग पुरजळकर मूळचे वसमत तालुक्यातील. आई-वडील लहानपणीच वारल्यामुळे मामाचे गाव असलेल्या कळमनुरी येथे आलेल्या शिवलिंग यांनी उदरनिर्वाहासाठी औषधी दुकानावर काम केले. येथे औषधी दुकानावर काम करता-करता आपला मुलगाही डॉक्टर झाला पाहिजे असे स्वप्न पाहिले. पुढील काळात शिवलिंग पुरजळकर यांनी आपल्या भावाच्या समवेत शहरांमध्ये हातगाड्यांवर पाणीपुरीचा विक्रीचा व्यवसाय सुरू केला.

कुठलाही आधार नसताना शिवलिंग याने या व्यवसायात आपला जम बसवला. आपण शिक्षणाअभावी मागे राहिलो ही खंत बाजूला ठेवत त्यांनी आपल्या मुलीला व मुलाला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. पाणीपुरीच्या व्यवसायामधून मुलांच्या शिक्षणासाठी हातभार लावणाऱ्या शिवलिंग पुरजळकर यांच्या मुलीने शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण केला तर मुलगा अक्षय याने वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता वैद्यकीय अभ्यासक्रमात जिद्दीने मेहनत घेतली.

परभणी येथील वैद्यकीय महाविद्यालयात बीएएमएस या अभ्यासक्रमासाठी त्याची निवड झाली होती. हा अभ्यासक्रम त्याने सचोटी व निष्ठेने पूर्ण केला. वैद्यकीय अभ्यासक्रमाची पदवी मिळाल्यानंतर काही दिवसातच अक्षय पुरजळकर याची आरोग्य विभागांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून निवड झाली.

अल्पशिक्षित असलेल्या वडिलांनी अतिशय कष्ट आणि जिद्दीने मुलांना शिक्षण दिले आणि मुलांनीही कुटुंबाच्या संघर्षाची जाणीव ठेवत यशाला गवसणी घालत आजच्या युवक वर्गासमोर आपला वेगळा आदर्श ठेवला आहे.

ध्येय निश्चित असल्यास हमखास यश मिळते, हे लक्षात घेऊन प्रयत्नांची पराकाष्ठा केली. वडीलांचे कष्ट पाहून मोठ्या जिद्दीने वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर परीक्षेतही यश मिळवत वडिलांनी पाहिलेले स्वप्न साकार केले. याचाच आनंद होतो.

- डॉ. अक्षय पुरजळकर, कळमनुरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dussehra gold prices: दसऱ्याला सोन्याची झळाळी, सोनेखरेदीसाठी नागरिकांची तुडुंब गर्दी, काय आहे आजचा सोन्याचा भाव?

Prathamesh Parab : पाण्यासाठी भांडणं ते चार पायऱ्यांवरचं गल्ली क्रिकेट ; प्रथमेशने उलगडल्या त्याच्या चाळीतील घरातील आठवणी

Latest Maharashtra News Updates : किरकोळ बाजारात झेंडू दोनशे पार! फूल विक्रेत्यांकडून भाविकांची चांगलीच लूट

Maratha Reservaton: मराठा समाज व्होट बँक, म्हणूनच दिले आरक्षण; याचिकाकर्त्याचा न्यायालयात युक्तिवाद

Ravan Dahan Upay: दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रावण दहनाची राख घरी आणावी की नाही?

SCROLL FOR NEXT