Pankaja Munde: पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याच्या लिलावासाटी नोटीस आली आहे. २०३ कोटींच्या कर्ज वसुलीसाठी युनियन बँकेकडून प्रक्रिया सुरु आहे. ऑनलाईन पद्धतीने कारखान्याचा लिलाव होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
२५ जानेवारीला कारखान्याचा लिलाव असल्याचा उल्लेख नोटीसमध्ये करण्यात आला आहे. सकाळी १० वाजता हा लिलाव होणार आहे.
परळी येथे पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आहे. कारखान्याचे संचालक पंकजा मुंडे आहेत. मात्र गेल्या दिड वर्षापासून कारखाना अडचणीत आला आहे. यापूर्वी ईडीची नोटीस देखील कारखान्याला आली होती. युनियन बँकेचे २०३ कोटींचे कर्ज थकित आहे.
अनेकवेळा कर्जापोटी बँकेने नोटीस देखील बजावली होती. मात्र कारखाना प्रशासनाने अद्याप नोटीसला कसलही उत्तर दिलं नाही त्यामुळे २५ तारखेला ऑनलाईन पद्धतीने लिलाव होणार आहे. पंकजा मुंडे आणि त्यांचा कारखाना पुन्हा एकदा अडचणीत आला आहे.
यापूर्वी पंकजा मुंडे यांना मोठा झटका बसला आहे. त्यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला 19 कोटी रुपयांची जीएसटी नोटीस मिळाली होती. मुंडे यांनी कोणताही गैरव्यवहार झाल्याचा नकार करत आपला कारखाना आर्थिक संकटाचा सामना करत असल्याचे म्हटले होते.
यासोबतच पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त करत सुमारे 9 कारखान्यांना केंद्राकडून मदत देण्यात आली, मात्र त्यांचा कारखाना या यादीतून बाहेर ठेवण्यात आल्याचे सांगितले. अन्यथा आज साखर कारखानदारी या स्थितीला पोहोचली नसती, असे देखील त्यांनी स्पष्ट केले. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.