बीड : राज्याच्या विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. आगामी २० जून रोजी त्यासाठी मतदान होणार आहे. प्रत्येक राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. दुसरीकडे नेत्यांमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी चढाओढ सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. मी विधान परिषदेवर जावं ही कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. गेल्या अनेक वर्ष जनतेच्या प्रश्नांवर लढत आहे. (Pankaja Munde Say, Party Workers Wish To I Will Go Into Legislative Council)
आता विधान परिषदेच्या (Maharashtra Legislative Council Election) १० जागांसाठी निवडणूक होत आहे. अशावेळी विधान परिषदेवर मला पाठवावं, ही कार्यकर्त्यांची इच्छा. मात्र शेवटी पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतात. पक्ष जो निर्णय घेईल, तो मान्य असेल, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून २ जूनला अधिसूचना जाहीर होईल. उमेदवाराला ९ जूनपासून अर्ज दाखल करता येणार आहे. २० जूनला मतदान होणार आहे. आकड्यानुसार भाजपचे (BJP) ४ आमदार निवडून येऊ शकतात. यात पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांच्या नावाची चर्चा होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.