गंगाखेड (जिल्हा परभणी) : रेशनच्या धान्याची काळ्याबाजारात विक्री ही बाब नित्याचीच झाली. असून रेशनचे तांदूळ काळ्याबाजारात विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकास मिळाल्या नुसार गंगाखेड येथून काळ्याबाजारात विक्रीसाठी जाणारा ३५ टन तांदूळ टेम्पोसह जप्त केल्याची घटना (ता.२७) डिसेंबर रविवार रोजी रात्री घडली.
शहरातील मोंढा परिसरात रेशनचा तांदूळ मोठ्या प्रमाणात आला असून तो काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणार असल्याची गुप्त माहिती विशेष पथकास मिळाली यानुसार विशेष पथकाच्या कर्मचाऱ्यांनी सद्गुरु ट्रेडर्स व पवन ट्रेडर्स च्या गोदामावर छापा टाकला असता. या ठिकाणी एकूण ३५ टन रेशनचे तांदूळ आढळून आले.छापा टाकला असता त्या ठिकाणी बारदाना बदलून राशन काळ्याबाजारात विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची घेऊन जाणार असल्याची माहिती उघडकीस आली. काळ्या बाजारात जाणाऱ्या तांदळाचे मोजमाप केले असता यामध्ये ३५ टन तांदूळ आढळून आला. त्याची किंमत सहा लाख बारा हजार पाचशे रुपये एवढी आहे. सदरील धान्य वाहन क्रमांक एम.एच.२०.ई.जी.२१२६ टेम्पो मधून काळ्याबाजारात जाणार होते. सदरील टेम्पो तांदळासह व दोन आरोपी विशेष पथकाने गंगाखेड पोलीस स्टेशन येथे जमा केले. सदरील कार्यवाही पोलीस अधीक्षक जयंत मीना, अतिरिक्त पोलिस अधिक्षक मुक्कमा सुदर्शन त्यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षाविषयक पोलीस उपअधीक्षक दडस, पोलीस निरीक्षक विश्वास खोले, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, यशवंत वाघमारे, राहुल चींचाने, शंकर गायकवाड, अजहर पटेल, विष्णू भिसे, दीपक मुदीराज यांनी केली.
हेही वाचा - हरीत नांदेड अभियानांतर्गत महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा व वृक्षमित्र फाऊंडेशनतर्फे वृक्ष लागवड -
अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू
गंगाखेड : तालुक्यातील सुनेगाव सायाळा येथील युवक आत्माराम बालासाहेब फिस्के हे रूमणा येथून सुनेगाव कडे पायी चालत येत असताना ता. २६ डिसेंबर शनिवार रोजी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
तालुक्यातील सुनेगाव सायाळा येथील युवक आत्माराम बाळासाहेब फिस्के (३८) हे रूमणा येथून सुनेगाव सायाळा या आपल्या गावी पायी येत असताना सुनेगाव पाटीजवळ परसराम सूर्यवंशी यांचे शेतातील हौदाजवळ परभणी ते गंगाखेड रोडवर अज्ञात वाहन चालकाने वाहन निष्काळजीपणाने चालवत जोराची धडक दिली. यामध्ये आत्माराम फिस्के यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. बाळासाहेब रामभाऊ फिस्के यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध (ता.२७) डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश राठोड, पोलीस कर्मचारी ओम वाघ, बीट जमादार दत्ता पडोळे हे करत आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.