file photo 
मराठवाडा

परभणी : वालूरात ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीत राडा; परस्पर विरोधी गुन्हा

संजय मुंडे

वालूर (ता. सेलू जिल्हा परभणी) : सेलू तालुक्यातील वालूर ग्रामपंचायतीच्या पहिल्याच मासिक बैठकीत गुरुवारी (ता. १८) सरपंच व नवनिर्वाचित सदस्यांत प्रभागातील सार्वजनिक नळयोजनेच्या कारणावरुन शाब्दिक चकमक झाली. एकमेकांवर धाऊन मारहाणीपर्यंत प्रकरण गेल्याने सेलू पोलिसांत परस्पर विरोधी गुन्हा करण्यात आला आहे. 

वालूर ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली. तालुक्यात राजकीय दृष्ट्या महत्वाची तसेच सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या १७ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीला गावाच्या विकास कामांसाठी शासनाकडून दरवर्षी  विविध स्वरुपात लाखो रुपये निधी प्राप्त होतो. यामुळे ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची झाली. सरपंच संजय साडेगावकर यांचे या वेळी १७ पैकी ११ सदस्य निवडून आल्याने त्यांचे ग्रामपंचायतीवरील वर्चस्व कायम राहीले. तर विरोधी गटाचे १७ पैकी सहा सदस्य निवडून आले. 

गुरुवारी ग्रामपंचायतीच्या सभागृहात नवनिर्वाचित सदस्यांचे पहिल्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या पहिल्याच बैठकीदरम्याण सदस्य लिंबाजी रामराव कुपणवार, रामराव शामराव बोडखे यांच्यात प्रभागातील नळयोजनेवरुन वाद सुरू झाला. एकमेकांवर खुर्च्या फेकून मारहाणीपर्यंत प्रकरण गेले. 

दरम्यान लिंबाजी रामराव कुपणवार यांनी दिलेल्या तक्रारींवरुन सरपंच संजय नारायणराव साडेगावकर व रामराव शामराव बोडखे यांच्या विरोधात मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तर सरपंच नारायणराव साडेगावकर यांनी आपल्याला मारहाण करुन गळ्यातील दोन तोळे सोन्याची चेन हिसकावून घेतली असल्याची तक्रार केली असल्याने लिंबाजी रामराव कुपणवार, सतीष गणपतला कलाल, चंद्रकांत हनुमंतराव चौधरी व धारुजी त्र्यंबक धाबे या चौघांविरोधात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल यांनी वालूर येथे घटनास्थळी भेट दिली.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare : आता काय नारायण राणेंना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करायचे का? सुषमा अंधारेंची सडकून टीका

Crime News : अमरावती मार्गावर १७ किलो सोने, ५० किलो चांदी जप्त...अंबाझरी पोलिसांची कारवाई : गनमॅनसह चौघे ताब्यात

Hingoli Assembly Election 2024 : निवडणुकीच्या प्रचारतोफा सोमवारी थंडावणार

Best Places Near Mussoorie: मसूरीजवळील 'या' सुंदर ऑफबीट ठिकाणांना करा एक्सप्लोअर, सहल राहील स्मरणीय

Laxman Hake: ''...तर महायुतीला मतदान करा'' लक्ष्मण हाकेंनी दिला पाठिंबा; दगडापेक्षा वीट मऊ

SCROLL FOR NEXT