Mahadev Jankar Defeat 
मराठवाडा

Parbhani Constituency Lok Sabha Election Result: परभणीकरांनी जानकरांना दाखवला 'बाहेर'चा रस्ता; जाधवांची 'बॉस'गिरी कायम

Parabhani Lok Sabha Election Result 2024 RSP Mahadev Jankar defeated by Shivsena UBT candidate Sanjay Jadhav : परभणीत महादेव जानकर विरुद्ध संजय जाधव अशी लढत झाली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Parabhani Lok Sabha Election Result 2024 : परभणी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर यांचा पराभव झाला आहे. तर विद्यामान खासदार बॉस ऊर्फ संजय जाधव यांनी विजयाची हॅट्रिक साधली आहे. १ लाख २१ हजार मतांनी जाधव यांनी जानकरांचा पराभव केला.

शिवसेना भाजप युती असताना परभणी मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. पण आत्ता शिवसेनेच्या फुटीनंतर इथले विद्यमान खासदार संजय जाधव ऊर्फ बंडू जाधव हे ठाकरेंशी निष्ठा राखून राहिल्यानं सहाजिकचं त्यांनाच पुन्हा उमेदवारी मिळाली. मात्र, महायुतीत हा मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडं गेला. राष्ट्रवादीनं आपल्या कोट्यातील या जागेवरुन राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांना संधी दिली आहे. पण दरवेळी कळीचा ठरणारा 'खान की बाण' हा मुद्दा यंदा इथल्या निवडणुकीत नव्हता, त्यामुळं मुस्लिमांची मतंही यंदा ठाकरेंसाठी निर्णयाक ठरली आहेत.

यंदा किती झालं मतदान?

परभणी लोकसभा मतदारसंघात यंदा ६२.२६ टक्के इतकं एकूण मतदान झालं आहे. या लोकसभेच्या सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये यंदाचं मतदान हे ६० टक्क्यांच्यावर झालेलं आहे. त्यामुळं अत्यंत चर्चेत राहिलेली जानकर विरुद्ध बॉस ही निवडणूक अधिकचं रंजक होणार आहे. यात कुणाचं पारडं जड राहतंय हे आता ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

२०१९ मध्ये अशी होती स्थिती?

संजय जाधव (शिवसेना) विजयी मते : ५,३८,९४१

राजेश विटेकर (राष्ट्रवादी काँग्रेस) मते : ४,९६,७४२

राजन क्षीरसागर (सीपीआय) मते : १७,०९५

विजयी उमेदवारांचे मताधिक्य : ४२,१९९

यंदाच्या निवडणुकीत गाजलेले मुद्दे

जिल्ह्यात उद्योगांची वानवा, कापूस व सोयाबीन प्रक्रिया उद्योगाची गरज

परभणी - छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे दुहेरीकरणाचा प्रश्न कायम

शहरांतर्गत रस्ते अन् भूमिगत गटार योजनेचा प्रश्न कायम

जायकवाडीतून सिंचनासाठी पुरेसे पाणी मिळण्याबाबत निर्णय होणं गरजेचं

विधानसभा क्षेत्रात झालेलं मतदान

गंगाखेड - ६३.०० टक्के

घणसांगवी - ६०.९३ टक्के

जिंतूर - ६२.४३ टक्के

परभणी - ६२.६२ टक्के

परतूर - ५९.६० टक्के

पाथरी - ६४.२७ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT