03 
मराठवाडा

परभणी जिल्हा मध्यवर्ती बॅंक; ३३ उमेदवार रिंगणात, सहा जण बिनविरोध  

गणेश पांडे

परभणी ः अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ४३ उमेदवारांनी स्वतःचे अर्ज माघारी घेतले. त्यामुळे आता संचालक मंडळाच्या १५ जागेसाठी निवडणुकीच्या रिंगणात ३३ उमेदवार राहिले आहेत. 

हिंगोली मतदारसंघ
हिंगोली मतदारसंघातून दत्तराव जाधव यांच्यासह गुलाबराव सरकटे यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे तेथून आमदार तानाजी मुटकूळे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. गंगाखेडातून सुभाष ठवरे, प्रल्हादराव मुरकूटे झोलकर, यशश्री सानप यांनी माघार घेतली. त्यामुळे भगवान सानप यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. वसमतमधून आमदार राजू नवघरे यांचा अर्ज कायम राहिला. तेथून अंबादासराव भोसले, दत्तराव काळे, खोब्राजी नरवाडे या तिघांनी माघार घेतली. सविता नादरे यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला. त्यामुळे आमदार नवघरे यांचा सविता नादरे यांच्याशी सामना होणार आहे. 

पालम, सोनपेठ
पालममधुन गणेशराव रोकडे विरूध्द लक्ष्मणराव दुधाटे विरुध्द नारायण शिंदे अशी तिरंगी लढत होणार आहे. या ठिकाणावरून तुषार दुधाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. सोनपेठमधून श्रीकांत उत्तमराव भोसले यांनी माघार घेतली. त्यामुळे तेथून राजेश विेटेकर विरूध्द गंगाधर कदम यांच्या लढतीचा मार्ग मोकळा झाला. 

सेनगाव, औंढा, कळमनुरी 
सेनगावमधून रुपाली पाटील यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे साहेबराव पाटील गोरेगावकर विरुध्द राजेंद्र देशमुख यांची लढत होईल. औंढा नागनाथमधून राजेश पाटील गोरेगावकर यांच्या विरूध्द शेषराव कदम यांच्यात लढत अटळ ठरली आहे. येथून गयाबराव नाईक व मनिष आखरे यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. कळमनुरीमधून यशोदाबाई चव्हाण, शिवाजी माने व सुरेशराव पतंगे वडगावकर यांच्यात तिरंगी लढत होईल. 


कृषी पणन संस्था व शेतीमाल प्रक्रिया मतदारसंघ
कृषी पणन संस्था व शेतीमाल प्रक्रिया मतदारसंघातून माजी आमदार सुरेश देशमुख विरूध्द बाळासाहेब निरस यांच्यात लढत होईल. इतर शेती संस्था मतदारसंघातून समशेर वरपुडकर, शशीकांत वडकुते, चंद्रकांत चौधरी, भगवानराव वटाणे, सोपानराव करंडे, बालाजी त्रिमले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे तेथून विजय जामकर,आनंद भरोसे व ज्ञानेश्वर जाधव यांच्यात तिरंगी लढत होईल. महिला प्रतिनिधी मतदारसंघातून रुपाली पाटील, प्रेरणा वरपुडकर, विद्या चौधरी व भावना रामप्रसाद कदम बोर्डीकर यांचे उमेदवारी अर्ज कायम राहिले आहेत. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून अतुल सरोदे विरूध्द शिवाजीराव मव्हाळे यांच्यात सरळ लढती होईल. विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघातून अ‍ॅड. स्वराजसिंह परिहार, दत्तात्रय मायंदळे व भगवानराव वटाणे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातून भगवानराव वाघमारे व प्रल्हादराव चिंचाणे यांच्यात सरळ लढत होणार आहे. 

वरपुडकर - बोर्डीकर गटातच लढत 
गेल्या अनेक वर्षापासून ज्या वरपुडकर - बोर्डीकर गटाचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर वर्चस्व राहिले. त्याच दोन्ही गटामध्ये सरळ लढत होण्याची चिन्हे आहेत. दोन्ही नेत्यांनी त्या दृष्टीने स्वतःचे राजकीय डावपेच खेळले असून आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी अजूनही काही राजकीय खेळ्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परत एकदा वरपुडकर - बोर्डीकर गटाच्या राजकारणाकडे जिल्ह्यातील राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे. 

संपादन ः राजन मंगरुळकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT