परभणी : कोरोना साथीमुळे तीन वर्षांच्या खंडानंतर यंदा प्रथमच येथील सय्यद शाह तुराबुल हक येथे ता. १ फेब्रुवारीपासून उरुस भरणार असून, या उरुस काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सोमवारी (ता.१६) केले.
जिल्हा पोलिस अधीक्षक आर. रागसुधा, महापालिका आयुक्त तृप्ती सांडभोर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते, उपजिल्हाधिकारी डॉ. सुशांत शिंदे, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, प्रादेशिक वक्फ बोर्ड अधिकारी खुसरो खान, जिल्हा वक्फ बोर्ड अधिकारी अब्दुल रफिक आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी आयोजित बैठकीस उपस्थित होते.
उरुस काळात येथे येणाऱ्यांना पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे, सोयी सुविधांबाबतची माहिती देणारे फलक जागोजागी दर्शनी भागात लावणे, दुकानांचे परवाने सहज मिळावेत, यासाठी येथे संबंधित विभागांची तात्पुरती सुविधा उपलब्ध करुन देणे, मदत केंद्राचे भ्रमणध्वनी आणि दूरध्वनी क्रमांक दर्शनी भागात लावण्याबाबतचे आदेश त्यांनी दिले.
या काळात परिसरात तयार होणारे खाद्यपदार्थ तपासण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य रीतीने पार पाडावी. तसेच शहरातील विविध भागातून येणाऱ्या यात्रेकरूंच्या प्रवासासाठी एसटी बसेस पुरविणे,
अग्निशमन यंत्रणेच्या अधिकाऱ्यांकडून यात्रा काळात करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करुन त्यानुसार दुकानांची व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी आयोजकांना दिले. तसेच व्यावसायिक दुकानांच्या जाहीर लिलावाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत ही प्रक्रिया पारदर्शी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
उरुस यात्रा काळात महावितरणकडून विद्युत यंत्रणा चोख ठेवणे आणि यात्रास्थळाकडे येणाऱ्या रस्त्यातील खड्डे बुजविण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे राहणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची दुरुस्ती तत्काळ करावी. व्यावसायिक दुकानदारांची संपूर्ण माहिती वेळोवेळी देणे अनिवार्य राहील. वक्फ बोर्डाने पोलिस यंत्रणेसोबत योग्य समन्वय ठेवण्यासाठी जबाबदार व्यक्तीची नियुक्त करावी.
- रागसुधा आर, पोलिस अधिक्षक, परभणी
महानगर पालिकेची आर्थिक स्थिती अडचणीची असल्यामुळे उरुस काळात महापालिकेकडून पुरविण्यात येणाऱ्या सर्व सोयीसुविधांचे शुल्क वक्फ बोर्डाला भरावे लागणार आहे. यापूर्वीची थकबाकी आणि यावर्षीची मिळून १४ लाख रुपये महापालिकेकडे जमा करावे.
- तृप्ती सांडभोर, आयुक्त, महापालिका, परभणी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.