Parbhani Ncp esakal
मराठवाडा

Parbhani Ncp: आम्ही एकसंघ राहणार! परभणी जिल्ह्यातील नेत्यांचे शरद पवारांना समर्थन; नेत्यांनी भूमिका स्पष्ट केली

सकाळ डिजिटल टीम

परभणी: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर परभणी जिल्ह्यातील जवळपास सर्वच नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आम्ही एकसंघपणे शरद पवार यांच्या पाठीशी राहणार असल्याचे सोमवारी (ता. तीन) घोषित केले.

जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांचे बळ एकवटून आगामी काळात पक्ष अजून मजबूत करणार असल्याचे एकमुखाने ठरविण्यात आले.

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातील नेते व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

अजित पवार वेगळे निघाल्यानंतर परभणी जिल्ह्यातील अनेक बड्या नेत्यांनी त्यांची भूमिका अद्यापही स्पष्ट केलेली नाही. एकटे पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांनी मात्र आपण अजित पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे पहिल्यांदाच जाहीर केले.

मात्र, जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवार यांनाच पाठिंबा असल्याचे जाहीर केले. सोमवारी सकाळी राष्ट्रवादी कॉँग्रेस कार्यालयात पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत एकसंघपणे शरद पवार यांच्या पाठीशी राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीस राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार अॅड. विजयराव गव्हाणे, जिल्हाध्यक्ष आमदार दुर्राणी, माजी आमदार विजय भांबळे, प्रा. किरण सोनटक्के, अजय चौधरी, प्रसाद बुधवंत, अजय गव्हाणे, तालुकाध्यक्ष संतोष देशमुख, सुमंत वाघ, कृष्णा कटारे यांच्यासह माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.

यावेळी पक्ष संकटात असताना कुणीही पक्ष सोडून इतरांच्या पाठी मागे जाऊ नये असे एकमुखाने ठरविण्यात आले. आजच्या बैठकीस काही नेते व कार्यकर्ते गैरहजर राहिले असले तरी आगामी दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल असेही या बैठकीत सांगण्यात आले.

विटेकर, केंद्रे व घनदाट अनुपस्थित

एकीकडे राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये पडलेली फूट पाहता कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांनी सोमवारी कार्यकर्ते व नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. अशा आणीबाणीच्या काळात पक्षाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहण्यासाठी सर्वजणांनी एकसंघ दाखविण्याचा प्रयत्न केला.

परंतु, या बैठकीला व नंतर झालेल्या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, गंगाखेडचे माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे, माजी आमदार सीताराम घनदाट यांची अनुपस्थिती खटकणारी ठरत होती.

या अनुपस्थितीबद्दल नेत्यांना विचारले असता त्यांनी ते त्यांच्या तालुक्यात बैठका घेत असल्याचे सांगून वेळ मारून नेली.

अजित पवारांचे छायाचित्र काढण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात राज्यस्तरावरील सर्व नेत्यांची छायाचित्रे लावण्यात आलेली आहेत. दर्शनीभागातच अजित पवारांचा मोठा फोटो आहे. सोमवारी बैठक सुरू झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचा फोटो त्या ठिकाणावरून काढण्याचा प्रयत्न केला.

परंतु, नंतर जिल्हास्तरीय नेत्यांनी तातडीने हा फोटो परत पहिल्याच ठिकाणी लावण्याचे सांगितल्यानंतर फोटो परत जागेवर लावण्यात आला. मात्र, असा कोणताही प्रकार झाला नाही. असे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी पत्रकारांना सांगितले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वार आमचा विश्वास आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीमागे राहणार आहोत. सध्या राज्यात जातीयवादी राजकारण वाढले आहे. अल्पसंख्याक समाज भयभीत झाला आहे. जे गेले सत्तेसाठी गेले आम्ही मात्र शरद पवारांच्या विचारांचे पाईक आहोत.

- बाबाजानी दुर्राणी, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉँग्रेस

परभणी हा शरद पवारांचा गढ आहे. आम्ही कणखरपणे शरद पवार यांच्या पाठीमागे उभे आहोत. जे घडले ते सर्वसामान्यांना आवडले नाही. ही घरफोडी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या वक्तव्यानंतरच या घडामोडी घडल्या आहेत. आगामी काळात पूर्ण जिल्हा पिंजून काढणार आहोत.

- अॅड. विजयराव गव्हाणे, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी कॉँग्रेस

जिल्ह्यातील एकही नेता व कार्यकर्ता कुठेही जाणार नाही. आम्ही एकसंघ होतो व भविष्यातही शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली एकसंघ राहू. शेवटी जनतेच्या मनात शरद पवारांचे नेतृत्व आहे. त्याला कोणीही नाकारू शकत नाही. आगामी निवडणुकांच्या माध्यमातून जनता घरफोड्या करणाऱ्यांना धडा शिकवेल.

- विजय भांबळे, माजी आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT