Parbhani District Collector Anchal Goyal  esakal
मराठवाडा

Parbhani : यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईची शक्यता ; आंचल गोयल, जिल्हाधिकारी

अल निनोच्या समुद्र प्रवाहाच्या सक्रियेतेचा होऊ शकतो परिणाम

सकाळ वृत्तसेवा

परभणी : अल निनोच्या‌ समुद्र प्रवाहाची सक्रियता लक्षात घेता जिल्ह्यात आगामी काळात संभाव्य पाणीटंचाई जाणवू शकते, त्यामुळे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात संभाव्य पाणीटंचाई निवारण विशेष कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावे, असे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण पॅसिफिक महासागरातील अल निनो या समुद्री प्रवाहाच्या सक्रियतेमुळे देशातील मॉन्सून पर्जन्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

त्यामुळे जून २०२३ नंतरही पिण्यासाठी पाणीटंचाई जाणवू शकते. त्यामुळे पाणीटंचाई‌ निवारणाच्या उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. तसेच उन्हाळ्यात तीव्र उष्णतेच्या लाटा येण्याचा अंदाज असून, तीव्र उष्णतेमुळे स्त्रोतातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणीसाठा झपाट्याने खालावू शकण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

गतवर्षी जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस झाला होता, त्यामुळे सद्यःस्थितीत जलस्त्रोतांमध्ये मुबलक पाणीसाठा असून, जिल्ह्यात टँकरची आवश्यकता भासणार नाही. तरीही खबरदारीच्या उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासन विभागनिहाय उपाययोजना करणार आहे. आगामी संभाव्य पाणी टंचाईची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासन कडक पावले उचलताना दिसत आहे.

यासाठी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी शुक्रवारी (ता.२४) आढावा बैठक घेतली. या बैठकीत पाणीटंचाई निवारण विशेष कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी विभाग प्रमुखांना दिले. मागील १० वर्षांतील पाणीटंचाईचा आढावा घेऊन तशी काळजी घेण्याबाबत त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची ६५ गाव योजना, जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या स्त्रोतांमधील सद्यःस्थितीतील पाणीसाठ्याचा आढावाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतला. तसेच शासनस्तरावर पाणीटंचाईबाबतचा पुन्हा पाठपुरावा होणार असून, पाणीटंचाईवर कायमस्वरूपी किंवा तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना असल्यास त्याची माहिती जिल्हा स्तरावरील यंत्रणेला देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

अशा सुचविल्या उपाय योजना

ग्रामीण तसेच शहरी भागासाठी विशेषत: पिण्याच्या पाण्यासाठी जलयुक्त शिवार, अटल भूजल योजना, पाऊस पाणी संकलन व कॅच द रेन पिण्याचे पाण्याचे स्त्रोतांचे बळकटीकरण या योजनेला अभियान स्वरूपात राबवावे.

पाण्याचे स्त्रोत, पाणीपुरवठा करणाऱ्या संस्था, त्यांचे नियोजन, ग्रामीण भागातील हातपंप दुरुस्त करणे, कूपनलिका, विहिरीतून पाणीपुरवठा सुरळीत ठेवता येईल, याकडे लक्ष द्यावे.

आगामी काळात लवकर पावसाळा सुरु न झाल्यास महापालिका, नगरपालिका आणि ग्रामीण स्तरावर पाणीपुरवठा उपाययोजना करण्यामध्ये संबंधित यंत्रणेने तत्काळ कार्यवाही करावी. उपाययोजना करताना वन्यप्राण्यांसाठी जंगलातील पाणवठ्यांमध्ये मुबलक पाणी राहील, याचे नियोजन देखील करावे.

- आंचल गोयल, जिल्हाधिकारी, परभणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT