सेलू (जिल्हा परभणी) : तालुक्यात ५५ ग्रामपंचायतीसाठी होत असलेल्या निवडणूकांसाठी ६५ हजार १८३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी उमेदवारांनी आपल्या गावात प्रचाराचे बॅनर तर लावलेच परंतू सेलू शहरातही प्रचाराचे बॅनर लावून आपणच प्रचारात आघाडी घेतल्याचे दाखवित असल्याचे चित्र शहरातील नागरिकांना दाखवित आहेत.
तालुक्यात होत असलेल्या ५५ ग्रामपंचायतीमधिल १६८ वाॅर्डातून ५६१ महिला व ३३९ पुरूष असे नऊशे उमेदवार निवडणूक रिणंगणात असून त्यापैकी ४१० उमेदवारांचीच निवड होणार आहे.
५५ ग्रामपंचायतीसाठी ५२ ग्रामपंचायतीत वाॅर्ड निहाय प्रत्येकी ०३ मतदान केंद्रे आहेत.तर पार्डी—कौसडी येथे ०२ आणि देऊळगाव ( गात ) येथे ०४ तसेच वालूर येथे १२ अशी एकूण १७४ मतदान केंद्रे आहेत.यापूर्वीच बारा ग्रामपंचायती व बारा ग्रामपंचायतीच्या विविध प्रभागातून १०९ सदस्यांची बिनविरोध निवड झाली असून त्यामध्ये ७० महिला आणि ३९ पूरूषांचा समावेश आहे.सेलू तालुक्यात ६७ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीतून ५१९ सदस्य निवडीची प्रक्रिया सुरू झाली.त्यामध्ये १२ ग्रामपंचायमधिल ८८ सदस्य व ग्रामपंचायतीच्या विविध प्रभागातुन २१ सदस्य असे एकूण १०९ सदस्य निवडले आहेत.
हेही वाचा - खळबळजनक ! महाराष्ट्रात पोहोचला Bird Flu, मुरूंबा गावातील 800 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच
५५ ग्रामपंचायतीसाठी ४१० सदस्य निवडीसाठी १६८ वाॅर्डात १७४ मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया सूरू आहे.यासाठी आवघ्या चार दिवसांवर आलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांसाठी गावागावात प्रचार सभा, काॅर्नर बैठका, प्रत्येक्ष मतदारांच्या वारंवार भेटीगाठी घेण्यात उमेदवारांची चांगलीच दमछाक होत आहे. ग्रामपंचायत निवडणूकीत यावेळेस उभ्या असलेल्या उमेदवारांनी तालूक्याच्या ठिकाणी ये—जा करणार्या व तेथे वास्तव्यास असणार्या असणार्या मतदारांसाठी आम्हालाच मतदान करा असे प्रचाराचे बॅनर सेलू शहरात लावल्याने शहरातील नागरीकात या निवडणूकीची चर्चा चांगलीच रंगत आहे.
गावपातळीवर होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकांसाठी गावातील मतदार यावेळी पूर्वीच्या उमेदवारांपेक्षा नविन उमेदवाराला पसंती देत असल्याने गावातील ग्रामपंचायत निवडणूकीत बदल होणार असे मत मतदार बोलून दाखवित आहेत.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.