लिमला : यंदा परतीचा पाऊस चांगला झाला. त्यामुळे जलसाठ्यात मुबलक पाणी आहे. परिणामी, भाजीवर्गीय पीक चांगले बहरले आहे. मात्र, बाजारात भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सध्या शेतकऱ्यांच्या मेथीला शेकडा दोनशे रुपये असा अल्पभाव मिळत आहे. त्यातून लागवड खर्च दूरच शेत ते बाजारपेठ हा वाहतूक खर्चही निघत नाही. परिणामी, मेथीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
लिमला परिसरामध्ये अनेक शेतकरी भाजीपाला पिके घेतात. यामधून त्यांना चांगला नफा मिळतो. मात्र, सध्या भाजीपाल्यांचे दिवस फिरल्याचे दिसून येत आहे. दस्तापूर येथील शेख रशीद यांनी खरिपामधील मुख्य पीक काढल्यानंतर मेथीचे पीक घेतले. पोषक हवामान, शेताची चांगली मशागत व योग्य वेळी पाणी मिळाल्याने भाजीपाला चांगला पिकला. परंतु, बाजारात मात्र भाव मिळत नसल्याने भाजीपाला उत्पादक अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. पंधरा-वीस दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात १५-२० रुपयाला असणारी मेथीची जुडी आता पाच रुपयाला मिळत आहे. अडतीमध्ये तर मेथी विक्रीसाठी घेऊन आल्यास २०० रुपयास १०० जुडी विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ज्यातून मेथीसाठी लागणारे खत-पाणी, बाजारपेठेत आणण्यासाठीचा खर्च, अडत, हमाली खर्चदेखील निघत नसल्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत.
इतर पिकानेही केली निराशा
टोमॅटो, पालक, शेप आदी पालीभाज्यादेखील कवडीमोल किमतीने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे हे उत्पादक अवांतर खर्च टाळण्यासाठी गावोगाव फिरून स्वतः भाजीपाला विकण्याचा प्रयत्न करीत आहेत.
मेथीच्या भाजीचे पीक घेतले. मात्र, दर पडल्याने मेथीने साथ सोडली आहे. अडतीत दोनशे रुपयाला १०० जुड्या द्याव्या लागतात. मिळणाऱ्या पैशातून खर्चही निघत नाही. किमान खर्च तरी निघावा, ही अपेक्षा आहे.
शेख रशीद, शेतकरी, दस्तापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.