social media sakal
मराठवाडा

Parbhani : सोशल मीडियावर निवडणुकीचे धुमशान

आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास दाखल होणार गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

देवगावफाटा : सेलू तालुक्यात ११ ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला आहे. प्रत्येक मतदाराला आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी आता आठवड्याचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे आचारसंहिता न जुमानता सोशल मीडियावर ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान सुरू आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून अशा गावातील हालचालीवर बारीक नजर आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली.

निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाली की, निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार आचार संहिता लागू होते. ग्रामपंचायत निवडणुकीत तहसीलदार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करीत असल्याने तालुकास्तरीय स्वतंत्र आचारसंहिता कक्ष स्थापन केले जाते. तरीही नियमांना न जुमानता सोशल मीडियावर अत्यंत आक्रमक प्रचार रंगविण्यात येतो. त्याचबरोबर सामाजिक शांतता व जातीय सलोखा टिकून राहावा.

सोशल मीडियाचा वापर करून त्यात बाधा येऊ नये, यावर प्रतिबंध लागावा गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून सायबर सेल विभागही स्थापन केला जातो. यासाठी पोलिस अधीक्षक व डीवायएसपी यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथकदेखील तयार केले जाते. तालुक्यात सध्या सोशल मीडियावरील हालचालींवर या पथकांचे लक्ष आहे. व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्रामसह सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचे आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा पोलिस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

सोशल मीडियावर विचारतो कोण?

उमेदवारांना निवडणुकीच्या खर्चासाठी मर्यादा घालून देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार खर्चाचा हिशेब तहसील कार्यालयात जमा करावयाचा आहे. त्याचवेळी सोशल मीडियावर ‘पेड’ जाहिराती केल्या तरीही त्याचा हिशेब मात्र विचारला जात नसल्याने अनेकांकडून सोशल मीडियावर खास टीमची नेमणूकही केली आहे.

नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर समाजप्रबोधन व शैक्षणिक कामांसाठी करावा. सोशल मीडियाद्वारे ग्रामपंचायतीच्या पार्श्वभूमीवर जातीय तेढ निर्माण करणारे, अफवा पसरून सार्वजनिक शांतता भंग करणारे मेसेज पोस्ट केल्यास माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये व भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात येईल.

- बालाजी गायकवाड,सहाय्यक पोलिस निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT