परभणी ः साडेतीन लाख लोक संख्या असलेल्या परभणी शहराच्या सुरक्षिततेची जबाबदारी केवळ तीन पोलिस ठाण्यावर आहे. या तिन्ही पोलिस ठाण्याचे क्षेत्र मोठे व मनुष्य बळ कमी असल्याने पोलिसांवर अतिरिक्त ताण येत आहे. परिणामी शहरात गंभीर गुन्ह्ये घडण्याचे प्रमाण वाढले असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
परभणी शहराची लोकसंख्या साडेतीन लाखाच्याही वर पोहचली आहे. गावठाण परिसर वगळता शहराच्या बाह्यवस्त्यामध्येही रहिवाश्यांची संख्या मोठी आहे. दररोजच नव- नवीन कॉलन्या निर्माण होत असल्याने शहराच विस्तार होत आहे. वाढती लोकसंख्या पाहता येथील नगरपालिकेला महापालिकेचा दर्जा बहाल करण्यात आला खरा, परंतू त्या मानाने नागरी सुविधांची बोंब या शहरात दिसून येते. वाढत्या लोकसंख्येचा भार पोलिसावर खऱ्या अर्थाने दिसून येतो. असे असले तरी पोलिस दलातील मनुष्य बळाची संख्या वाढविली जात नाही.
परिणामी कमी मनुष्य बळावर पोलिसांना प्रचंड तणावाखाली काम करावे लागत आहे. शहराचे विभाजन सध्या तीन पोलिस ठाण्यातंर्गत झालेले आहे. त्यात नानलपेठ पोलिस ठाणे, कोतवाली पोलिस ठाणे व नवामोंढा पोलिस ठाण्याच्या माध्यमातून शहरातील गुन्हेगारीवर वचक बसविण्याचे काम केले जाते. त्यात धार्मीक सण - उत्सव, राजकीय सभा, व्हीआयपींचे दौरे सातत्याने होत असल्याने गुन्हे उघडकीस आणने किंवा गुन्हे तपासाच्या कामावर याचा विपरित परिणाम होतांना दिसतो.
एमआयडीसी पोलिस ठाण्याचा प्रस्ताव रखडला
जिल्ह्यात आज घडीला 19 पोलिस ठाणे कार्यरत आहेत. त्या पैकी चार पोलिस ठाणे हे परभणी शहरात असून त्यातील परभणी ग्रामीण पोलिस ठाण्याकडे ग्रामीण भागातील जबबादारी आहे. परंतू कोतवाली, नवामोंढा व नानलपेठ या तीन पोलिस ठाण्यावर संपूर्ण शहराचा भार आहे. त्यामुळे काही दिवसापूर्वी एमआयडीसी परिसरात वेगळे पोलिस ठाणे निर्मिती करून नवामोंढा पोलिस ठाण्यावरील भार कमी करण्याचा प्रस्ताव दाखल झाला होता. परंतू अद्याप त्या प्रस्तावावर काहीच निर्णय झालेला नसल्याचे समजते.
अशी आहे मुख्य जबाबदारी
नानलपेठ पोलिस ठाणे ः मुख्य बाजारपेठ, सरकारी दवाखाना, खंडोबा बाजार, शनिवार बाजार, 8 ते 10 बॅंका, तीन ते चार शाळा, इदगाह मैदान यासह 30 ते 40 कॉलन्या
नवामोंढा पोलिस ठाणे ः जिल्हाधिकारी कार्यालय, रेल्वेस्टेशन, 8 ते 10 बॅंका, एमआयडीसी परिसर, कृषी विद्यापीठ, शिवाजी महाविद्यालय या सह 30 ते 40 कॉलन्या
कोतवाली पोलिस ठाणे ः तुरुतपीर दर्गा परिसर, बसस्थानक परिसर, उड्डाणपुल, मोंढा मार्केट, दर्गा रोड परिसर, जिल्हा परिषद कार्यालय यासह 30 ते 40 कॉलन्या
संपादन - प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.