parbhani jalna rain update lower dudhana project 25 percent water storage sakal
मराठवाडा

Marathwada Rain Update : लोअर दुधना प्रकल्पात २५ टक्के जलसाठा

परभणी, जालन्यासाठी महत्त्वाचे धरण, समाधानकारक पावसाची प्रतीक्षाच

सकाळ वृत्तसेवा

सेलू : परभणी आणि जालना जिल्ह्यातील शेकडो गावांची तहान भागविणाऱ्या लोअर दुधना प्रकल्पात सद्य:स्थितीत केवळ २५.६५ टक्केच जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे.पावसाळा सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला आहे.

मात्र, अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. जालना जिल्ह्यात पाऊस झाल्यानंतर लोअर दुधना धरणात वेगाने पाण्याची आवक होते. मात्र, प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची प्रतिक्षा कायम आहे. गतवर्षी जून महिन्यात वेळेवर मॉन्सून दाखल झाला होता.

त्यामुळे जूनपासून प्रकल्पात पाण्याची आवक सुरू झाली होती. ऑक्टोबरपर्यंत सातत्याने वेगाने पाणी येत होते. ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर धरणातील अतिरिक्त पाणी दुधना नदीपात्रात सोडण्यात आले होते. त्यामुळे नदीकाठावरील शेतीचे नुकसान झाले होते. त्यावेळी तब्बल २५० हून अधिक दलघमी पाणी नदीपात्रात सोडण्यात आले होते.

प्रकल्पातून सेलू, परतूर, मंठा व जालना जिल्ह्यातील शेकडो गावांना पाणी पुरवठा केला जातो. तसेच रब्बी हंगामात दोन्ही कालव्यांतून चार आवर्तने व उन्हाळी पिकांसाठीही पाणी दिले जाते. त्यामुळे सेलू, मानवत, जिंतूर व परभणी तालुक्यातील कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळते.

यंदा अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. त्यातच दुधना धरणात केवळ २५.६५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. आधीच उन्हाळ्यातील चार महिन्यांत ३७ टक्के पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे.

धरणात सध्याचा साठा

लोअर दुधना प्रकल्पात सद्यःस्थितीत एकूण १६४.७३४ इतका जलसाठा आहे. जिवंत साठा २५.६५ टक्के आहे. गतवर्षी याच तारखेला ६७.८८ इतका जलसाठा धरणात होता.

गतवर्षी प्रकल्पात ७५ टक्केच जलसाठा ठेवण्यात आला होता. यावर्षी वरिष्ठांकडून यासंदर्भात कुठलीच माहिती न मिळाल्याने धरणात किती टक्के जलसाठा ठेवायचा, हे आताच सांगता येत नाही.

- बाळासाहेब मार्गे, शाखा अभियंता, लोअर दुधना प्रकल्प धरण, सेलू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT