परभणी : शिवसेनेच्या पदाधिकारी संवाद मेळाव्यात खासदार संजय जाधव, डॉ. विवेक नावंदर, विशाल कदम, राम पाटील, सखुबाई लटपटे, राजू कापसे, संदीप भंडारी, अंबिका डहाळे व इतर. सकाळ
मराठवाडा

परभणी पालिकेसह जिल्हा परिषदेवरही भगवा, खासदार जाधवांना विश्वास

गणेश पांडे

परभणी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिंकण्याची जिद्द निर्माण झाली पाहिजे. येत्या निवडणुकीत परभणी महापालिकाच (Parbhani Municipal Corporation) काय तर जिल्हा परिषदेवरही निश्चितपणे भगवा फडकविल्या शिवाय राहणार नाही असा विश्वास खासदार संजय जाधव (MP Sanjay Jadhav) यांनी बुधवारी (ता.१८) व्यक्त केला. खासदार संजय जाधव यांचे हे वक्तव्य मित्रपक्षासह विरोधकांनाही इशारा तर नसावा अशी चर्चा आता पक्ष कार्यकर्त्यांमधून रंगत आहे. परभणी येथील बी. रघुनाथ सभागृहात शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाअंतर्गत (Shiv Sampark Abhiyan) पदाधिकाऱ्यांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख विशाल कदम, राम पाटील, अर्जून सामाले, सखुबाई लटपटे, माणिक पोंढे पाटील, दीपक बारहाते, सदाशिव देशमुख आदींची उपस्थिती होती.

यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांना संबोधन करताना श्री.जाधव म्हणाले, गोरगरिबांचे दु:ख वाटून घेण्यासाठी शिवसेना उदयास आली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचाराचा वारसा शिवसैनिक पुढे नेत आहेत. शिवसैनिकांनी समाज हिताचे काम करत असतांना कधीही परिणाम, दुष्परिणामाची पर्वा केली नाही. त्यामुळेच शिवसेनेचा वृक्ष आता वटवृक्ष झाला आहे. त्याच्या सावलीत बसणे खुप झाले. आता मैदानात उतरावे लागणार आहे. २०२२ च्या जिल्हा परिषद व परभणी महापालिकेच्या निवडणुकीत एक दिलाने काम करून या दोन्ही ठिकाणी शिवसेनेची सत्ता आली पाहिजे. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. मनात जिंकण्याची जिद्द ठेवली आहे आणि ती पूर्ण करणारच आहोत. या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आम्हीच सत्तेत असणार आहोत. आमची जिल्हाभर ताकद आहे. विरोधकांची तेवढी ताकद नाही. पंरतू स्वतःची ताकद ओळखून कामे करावी लागणार आहे. केवळ इच्छाशक्तीचा अभाव आहे. संघटनात्मक बांधणी करणे गरजेचे आहे असे ही ते म्हणाले.

निवडणुक स्वबळावर लढण्यास आम्ही समर्थ

खासदार संजय जाधव यांनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात परत एकदा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष केले. ते म्हणाले, आम्ही जिल्हा परिषदेवर भगवा फडकणार म्हटले की, राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पायाखालची वाळू सरकते. ही निवडणुक स्वबळावर लढण्यास आम्ही समर्थ आहोत. तुम्ही आले तर तुमच्यासह अन्यथा तुमच्या शिवाय असे सांगत त्यांनी एक प्रकारे राष्ट्रवादीला इशाराच दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT