file photo 
मराठवाडा

परभणी महापालिकेच्या ५७६ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी

सकाळ वृत्तसेवा

परभणी : महापालिकेच्या बुधवारी (ता. १७) प्रथमच घेण्यात आलेल्या ऑनलाइन अर्थसंकल्पीय विशेष सभेत २०२०-२१ च्या ५७६ कोटी ७६ लाख रुपयांच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास सूचना व दुरुस्त्यांसह मान्यता देण्यात आली.
महापालिकेत महापौर यांच्या दालनात महापौर अनिता सोनकांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. यावेळी दालनात उपमहापौर भगवान वाघमारे, आयुक्त देविदास पवार, उपायुक्त गणपत जाधव, नगरसचिव विकास रत्नपारखी, अंतर्गत लेखापाल भगवान यादव, शहर अभियंता वसीमखान पठाण, यांत्रिकी अभियंता मिर्झा तनवीर बेग, सहायक नगररचनाकार किरण फुटाणे, रईसखान, संगणक विभाग प्रमुख अदनान कादरी, राजकुमार जाधव, पवन देशमुख, मुजाहिदखान यांची उपस्थिती होती.

रंगमंदिराच्या दुरुस्तीसाठी  तरतूद
महापालिकेने ता. २३ मार्च रोजीची तहकूब अर्थसंकल्पीय विशेष सभा व सर्वसाधारण सभा एकापाठोपाठ एक घेतली. या सभेत काही सुधारणांसह स्थायी समितीने मंजुरी दिलेल्या ५७६ कोटी ७६ लक्ष रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये माजी महापौर श्रीमती मीना सुरेश वरपुडकर यांनी नटराज रंगमंदिराच्या दुरुस्तीसाठी ६० लाखांची तरतूद करण्याची मागणी केली. नगरसेवकांचा स्वेच्छा निधी तीन लाख रुपये करण्यात आला. आरोग्य विभागास कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी एक कोटी, पालिका शाळांमध्ये निर्जंतुकीकरणासाठी ५० लाख, हॉकर्स झोनसाठी एक कोटी रुपये आदी सूचनांना मान्यता देऊन त्याची अंदाजपत्रकात तरतूद करण्याचा निर्णय झाला.

सूचना मांडल्या व मंजुरी दिली

बालासाहेब बुलबुले, अतुल सरोदे, सचिन देशमुख, इम्रानहुसेनी, मोकिंद खिल्लारे, इम्रानहुसैनी, श्रीमती कमलताई काकडे, अशोक डहाळे, श्रीमती जयश्री खोबे, विकास लंगोटे, डॉ. वर्षा खिल्लारे, विरोधी पक्ष नेते विजय जामकर, स्थायी समिती सभापती गुलमीरखान आदींनी सूचना मांडल्या व मंजुरी दिली. ऑनलाइन सभेसाठी संगणक विभागाचे प्रमुख अदनान कादरी, सुमित दरक, शेख आर्शद आदींनी पुढाकार घेतला.


निम्मेच सदस्यांचा सहभाग
महापालिकेच्या अर्थसंकल्पीय विशेष सभेत निम्मेच सदस्य सहभागी झाल्याची माहिती आहे. प्रथमच ऑनलाइन सभा असल्यामुळे अनेक सदस्य जोडल्या गेले नसल्याचे समजते. काही महिला सदस्यांनी आपले विषय प्रभावीपणे मांडले. परंतु, काही महिला सदस्यांचे नातेवाईकच या मिटिंगमध्ये सहभागी झाल्याचे चित्र होते. मिटिंगमधून जा-ये करणाऱ्यांची संख्या मोठी होती. तर काही जण ॲडमिट करून घेण्याच्या प्रतीक्षेत ताटकळले होते. तांत्रिक अडचणी सोडल्यास ऑनलाइन मिटिंग यशस्वी झाल्याचे दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Rathod won in Digras Assembly Election Results 2024: माणिकराव ठाकरेंचा पुन्हा पराभूत, हायव्होल्टेज लढतीत संजय राठोड विजयी

Eknath Shinde : एकनाथ शिंदे महाविकास आघाडीपेक्षा भारी, केलीय आता पुढची तयारी

"त्याने माझ्या तब्येतीची चौकशी केली आणि..." शुटिंगमुळे थकलेल्या सलमानच्या कृतीने भारावली हिना , म्हणाली...

Prakash Solanke won Majalgaon Assembly election 2024 final Result: माजलगावमध्ये अटीतटीच्या लढतीत प्रकाश सोळंके विजयी, शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव

Ballarpur Assembly Constituency Result 2024 : बल्लारपूरमध्ये भाजपचा गुलाल! सुधीर मुनगंटीवारांनी 105969 मतांनी गड राखला

SCROLL FOR NEXT