Parbhani Municipality sakal
मराठवाडा

Parbhani Municipality : एजन्सी बदलाचे वारे, अधिकारी कावरेबावरे!;‘गडाला सुरुंग’च्या शक्यतेने आयुक्तांच्या बदलीसाठी ताकद

सकाळ वृत्तसेवा

परभणी : येथील महानगरपालिकेत सध्या विविध विभागांत कार्यरत एजन्सीला कुठल्याही प्रकारची मुदतवाढ न देता बदलण्याचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांच्या गडाला सुरुंग लागल्याचे बोलले जात आहे. तर या प्रकारामुळे चिडलेल्या अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या बदलीसाठी खर्च करण्याची तयारी दाखविल्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.

महानगरपालिकेत अधिकाऱ्यांची वानवा आहे. अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, नगररचना संचालक, शिक्षणाधिकारी यासह अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. या पदांचा अधिभार कनिष्ठ श्रेणीतील कर्मचाऱ्यांकडे देण्यात आला आहे. महापालिकेत अधिकारीच येत नसल्यामुळे व आले तरी चार-सहा महिन्यांत बदली करून जात असल्यामुळे यापैकी अनेक कनिष्ठ अधिकाऱ्यांना आयतेच अधिकार मिळत होते. त्यातूनच त्यांनी राजकीय पाठबळ मिळवून आपले स्वतःचे गड निर्माण केले होते. काहींचा एका विभागासह अनेक विभागांवर दबदबा होता. त्यामुळे अनेक प्रशासकीय निर्णयातही त्यांचा हस्तक्षेप प्रचंड वाढू लागला होता. परंतु, अशा काही अधिकाऱ्यांचे गड आता उद्‍ध्वस्त होत असल्याचे चित्र आहे.

अधिकाऱ्यांची भागीदारी

महानगरपालिकेत विविध कामांसाठी एजन्सी नियुक्त केलेल्या आहेत. पालिका त्यावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. परंतु, या एजन्सी नियमाप्रमाणे, कराराप्रमाणे कार्य करतात की नाही हे पाहण्याची जबाबदारी असलेले अधिकारी मात्र त्याकडे डोळेझाक करीत असल्याचे चित्र होते. काही अधिकाऱ्यांनी डमी एजन्सी देऊन स्वतःच काम घेतल्याचे; तसेच काही अधिकाऱ्यांची भागीदारी असल्याचेही बोलले जात होते. त्यामुळे कुंपणच शेत खात असेल तर? असा प्रश्न निर्माण झाला होता.

एजन्सी बदलण्याचा सपाटा

आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी वर्षभरापासून मुदत संपल्यामुळे मुदतवाढ न देता एजन्सी बदलण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे दुखावलेले अधिकारी त्यामध्ये अडथळे आणण्याचे प्रयत्न करीत आहेत. पालिकेतील महत्त्वाच्या चार ते पाच एजन्सी बदलण्याचा निर्णय झाला आहे. काही बदलल्या, काही निविदा प्रक्रियेत आहेत, तर काहींना कार्यारंभ आदेश देण्याचे बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली; तसेच अनके प्रभारी अधिकाऱ्यांकडे वर्षानुवर्षांपासून असलेले विभागही बदलण्यात आले आहेत.

आयुक्तांच्या बदलीसाठी देव पाण्यात

दर दोन महिन्याला आयुक्तांची बदली झाल्याची चर्चा पालिकेत होतच असते. आता दुखावलेल्या काही अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या बदलीसाठी देव पाण्यात ठेवले आहेत. आयुक्तांच्या बदलीवर दोन कोटी रुपये खर्च करण्याची तयारीही एकाने दाखविल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.

दिशाभूल करण्याचा प्रयत्न

आयुक्तांना महापालिकेतील एका चौकडीने घेरल्याचेही बोलले जाते. स्वतःच्या फायद्यासाठी अशी मंडळी चुकीची माहिती देऊन आयुक्तांची दिशाभूल करीत असल्याची कुजबुजदेखील पालिकेत सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाला याचाही विचार करावा लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT