Mysterious Sound In Parbhani District esakal
मराठवाडा

Parbhani : गूढ आवाजाने गोदाकाठ हादरला, सोनपेठमधील नागरिक भयभीत

नागरिकांत मोठी घबराट निर्माण होऊन भूकंप असल्याचे मानून अनेकांनी आपले घर सोडून पळ काढला.

सकाळ वृत्तसेवा

सोनपेठ (जि.परभणी) : सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठच्या काही गावांत अचानक गूढ आवाज येऊन जोराचे हादरे बसले. यामुळे नागरिकांत मोठी घबराट निर्माण होऊन भूकंप असल्याचे मानून अनेकांनी आपले घर सोडून पळ काढल्याची घटना गुरुवारी (ता.१६) घडली. तालुक्यातील गोदाकाठी (Godavari River) असणारे विटा, वाघलगाव, वाणीसंगम, दुधगाव आदी गावांत गुरुवारी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास अचानक भूगर्भातून मोठा गूढ आवाज स्थानिक नागरिकांना ऐकायला मिळाला. घरातील भिंती आणि दरवाजे, खिडक्या हादरत असल्यामुळे अनेकांनी आपल्या मुलाबाळांना (Sonpeth) घेऊन खुल्या मैदानात धाव घेतली. यावेळी अनेकांना हा भूकंप असल्याचा भास झाला तर अनेकांना या विचित्र आवाजामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. हा आवाज सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठच्या गावासह पाथरी (Pathari) तालुक्यातील देखील गोदाकाठावर असणाऱ्या काही गावांत देखील हा गूढ आवाज ऐकायला मिळाल्याची चर्चा होत होती. (Parbhani News Residents Of Sonpeth Taluka Frighten Due To Mysterious Sound)

गौण खनिज उत्खननामुळे भूगर्भात आवाज

सोनपेठ तालुका व परिसरात मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गौण खनिजांचे उत्खनन होत असल्यामुळे भूगर्भात त्याचा उलट परिणाम होत असल्याचे मत जुन्या जाणकार मंडळींनी व्यक्त केले आहे. तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा होतो. तसेच अनेक ठिकाणी असणाऱ्या डोंगरांना पोखरून मुरूम उत्खनन होत आहे. तसेच सध्या सर्वत्र बांधकाम चालू असून प्रत्येकजण बोअरवेल पाडत आहेत. त्यामुळे नैसर्गिक संपत्तीची हानी होत असल्यामुळेच भूगर्भात आमूलाग्र बदल होत असल्याचे मत जुनी जाणकार मंडळी व्यक्त करत आहेत.

सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठच्या काही गावांत आज भूगर्भातून गूढ आवाज येऊन हादरे बसल्याची माहिती मिळताच महसूल विभागाचे एक पथक त्या-त्या गावात प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. तसेच याबाबत कोणीही घाबरून न जाता हा गूढ आवाज का झाला याची भौगोलिक तज्ज्ञांकडून माहीती घेण्यात येईल अशी माहीती सकाळशी बोलतांना तहसीलदार सारंग चव्हाण यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT